{"title":"Ancient Wisdom Modern Health","description":"","products":[{"product_id":"mantra-jivancha-life-mantra-dr-balaji-tambe","title":"मंत्र जीवनाचा | The Life Mantra | Dr. Balaji Tambe","description":"\u003ch5\u003e मनोगत \u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमनोगत जर दोन शब्दांत लिहिता आले, तर तो मंत्रच होईल! ज्याचे मनन केल्याने कोणताही भौतिक व आध्यात्मिक प्रकारचा लाभ होतो. संकटापासून रक्षण करून मनुष्यमात्राला सुखी होण्यासाठी जो मदत करतो, तो मंत्र. अशाच एखाद्या विषयातून तयार झालेला मंत्र विस्तृतपणे समजावून लिहिला, की त्यालाच मनोगत म्हणत असावेत. विशुद्ध स्वरूपाच्या मनोगतात मंत्राची सारी लक्षणे दिसतात ती म्हणूनच.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात 'फॅमिली डॉक्टर' साठी लिहिलेल्या प्रस्तावना संपादित केलेल्या आहेत. हे प्रस्तावनांचे लेख लिहीत असताना उद्देश हा होता, की नुसते वैद्यकशास्त्रातील नव्हे तर रोगाचा, अनारोग्याचा, अशांततेचा किंवा माणसांमधील दुःखांचा इतर सर्व जीवनातील अंगांशी येणारा संबंध पाहून ते दुःख दूर करण्यासाठी जर काही कल्पना सुचली वा विचारसरणी दृढ झाली किंवा निदान सर्व सुस्पष्ट चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले तर चांगले. अशा दृष्टीने केवळ आयुर्वेदाच्या किंवा शरीराच्या आरोग्याचा विचार न ठेवता एकूणच मनुष्यत्वाचा विकास व शरीर, मन व आत्मा यांचे समत्व लाभावे व त्यासाठीच्या कल्पना मुक्तपणे लिहिता याव्यात या दृष्टीने या प्रस्तावना लिहिल्या होत्या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआयुर्वेद हा शब्दच जेव्हा मंत्र होऊन समाजात काम करू लागला तेव्हा वेगवेगळ्या निमित्ताने भेटणाऱ्या व्यक्तींनी त्यांचा आयुर्वेदावर कसा विश्वास आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला; पण आयुर्वेदावर म्हणजे नेमका कशावर विश्वास आहे? आयुर्वेद म्हणजे काय? असे प्रश्न विचारल्यानंतर त्याचे निश्चित उत्तर त्यांच्याकडून मिळू शकले नाही. एक लक्षात आले, की आयुर्वेद ही भारतीय परंपरा, भारतीय संपत्ती व भारतीय संस्कृती आहे आणि याचा सर्वांनाच अभिमान आहे. जसे अनेक संकटांना तोंड देऊन भारतीय संस्कृती टिकून राहिली तशाच पद्धतीने आयुर्वेदही टिकून आहे व तो जनसामान्यांनी घट्ट धरून ठेवलेला आहे; परंतु प्रत्यक्ष आयुर्वेदाची तपशिलात संकल्पना माहीत नसल्याने विश्वास आयुर्वेदावर पण प्रथम पसंती मात्र इतर सर्व आरोग्यव्यवस्थेवर असे परस्परविरोधी चित्र दिसू लागले. ते पाहिल्यानंतर पूर्वीच्या काळी अस्तित्वात असलेल्या, पण काळाच्या ओघात लुप्त झालेल्या, फॅमिली डॉक्टर या संकल्पनेला उचलून धरण्यासाठी 'फॅमिली डॉक्टर' ही पुस्तिका 'सकाळ'मधून प्रकाशित करण्याचे ठरले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्रातील संस्कृतीचे केंद्र असलेल्या पुणे शहरात व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात 'सकाळ' वर्तमानपत्र स्वतःची गुणवत्ता, लोकाभिमुखता, दर्जा टिकवून राहिलेले प्रमुख वर्तमानपत्र आहे. एका सामाजिक जबाबदारीतून आयुर्वेदासारख्या भारतीय पारंपरिक व भारतीयत्वात रुजलेल्या जीवनशास्त्राचा अभ्यास व्हावा, या उद्देशाने 'सकाळ'ने हे मोठे काम अंगावर घेतले. त्यातून 'फॅमिली डॉक्टर'चा उदय झाला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉक्टर किंवा वैद्यक व्यवसाय करू इच्छिणारे ज्या तऱ्हेने आयुर्वेदाचा अभ्यास करतात तीच पद्धत सर्वसामान्य लोकांना समजू शकेल असे वाटत नाही. जीवनाच्या आरोग्याचा विचार करण्याच्या दृष्टीने सर्वसामान्यांना माहीत नसलेले विषय, तसेच पूर्वी अनुभव घेतलेले विषय हसत खेळत आत्मसात करता यावेत, या दृष्टीने या प्रस्तावना लिहिण्याचा प्रयत्न केला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसर्वांनी अत्यंत प्रेमाने याचा स्वीकार केला. आमच्या जीवनात या प्रस्तावनांमुळे बदल झाले, शुक्रवारचा अंक हातात आला, की प्रथम प्रस्तावना वाचल्यानंतर पुढचा दिवस हसत-खेळत कसा जातो हे सांगणारी अनेक पत्रे आली. या सर्व प्रस्तावना केवळ आरोग्यासाठी नव्हे तर निखळ आनंदासाठी वारंवार वाचणारेही अनेक आहेत. या सर्व प्रस्तावना पुस्तकरूपाने प्रसिद्ध व्हाव्या अशी अनेक वाचकांनी इच्छा दर्शविली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eदमा, पोटदुखी वगैरे प्रत्यक्ष आयुर्वेदाशी संबंधित विषयांच्या प्रस्तावना एका भागात आणि मन, तारुण्य, प्रवास वगैरे आरोग्याशी निगडित असलेल्या इतर विषयांच्या प्रस्तावना दुसऱ्या भागात अशी वर्गवारी केली. अर्थात, या दोन्ही पुस्तकांतील प्रस्तावना वाचल्यानंतर हसत-खेळत विषय मनापर्यंत अवश्य पोहोचेल, त्याच्यावर मनन, चिंतन, चर्चा होऊन मन आनंदित झाल्यामुळेच आरोग्याचा लाभ होईल या हेतूने पुस्तकांना 'मंत्र जीवनाचा' व 'मंत्र आरोग्याचा' असे नामकरण केले. ही दोन्ही पुस्तके आज प्रसिद्ध होत आहेत याचा खूप आनंद होत आहे. या प्रस्तावना पुस्तकरूपाने प्रसिद्ध करतेवेळी पुनप्रत्ययाचा एक छान अनुभव आला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'मंत्र आरोग्याचा' व 'मंत्र जीवनाचा' ही दोन पुस्तके प्रत्यक्षात आणण्याचे मुख्य श्रेय 'सकाळ'चे श्री. अभिजित पवार, श्री. संजीव लाटकर व श्री. अभिजित मुख्य मुळ्ये यांचे आहे. तसेच पुस्तक वेळेवर प्रसिद्ध करण्यात श्री. हेमंत वंदेंकर व श्री. श्रीकांत चव्हाण व श्री. सत्यराज यादव यांचेपण सहकार्य लाभले. तसेच या पुस्तकांचे मुद्रण व वितरण या महत्त्वाच्या कार्याची जबाबदारी घेतल्याबद्दल मी 'सकाळ पेपर्स' प्रा. लि. व पुस्तकांच्या प्रकाशनाची जबाबदारी घेतल्याबद्दल 'बालाजी तांबे फाउंडेशन'चा आभारी आहे. श्रीमती विजया कोल्हे यांनी 'फॅमिली डॉक्टर' मधील प्रस्तावनांच्या टंकलेखनाचे काम केले, त्यांचेही मी आभारी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआज धनत्रयोदशी-धन्वंतरी जयंतीच्या दिवशी 'फॅमिली डॉक्टर' या साप्ताहिक पुरवणीला चार वर्षे पूर्ण होत आहेत व त्याच दिवशी या पुस्तकांचे प्रकाशन होत आहे, हा सुमंगल योग होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eश्री धन्वंतरींच्या कृपेने या मंत्रसंग्रहाचा आरोग्य व सुखसमृद्धीसाठी सर्वांनाच उपयोग व्हावा, ही प्रार्थना.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. श्री बालाजी तांबे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअश्विन वद्य त्रयोदशी, शके १९२९\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e(६ नोव्हेंबर २००७)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57228147949871,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/E680C4EF-2C89-4796-9D27-A8A2B12C503D.jpg?v=1777109084"},{"product_id":"mantra-arogyacha-dr-balaji-tambe","title":"मंत्र आरोग्याचा | Arogya Mantra | Dr Balaji Tambe","description":"\u003ch5\u003e\u003cspan\u003eमनोगत\u003c\/span\u003e\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eजर दोन शब्दांत लिहिता आले, तर तो मंत्रच होईल! ज्याचे मनन केल्याने कोणताही भौतिक व आध्यात्मिक प्रकारचा लाभ होतो. संकटापासून रक्षण करून मनुष्यमात्राला सुखी होण्यासाठी जो मदत करतो, तो मंत्र. अशाच एखाद्या विषयातून तयार झालेला मंत्र विस्तृतपणे समजावून लिहिला, की त्यालाच मनोगत म्हणत असावेत. विशुद्ध स्वरूपाच्या मनोगतात मंत्राची सारी लक्षणे दिसतात ती म्हणूनच.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात 'फॅमिली डॉक्टर' साठी लिहिलेल्या प्रस्तावना संपादित केलेल्या आहेत. हे प्रस्तावनांचे लेख लिहीत असताना उद्देश हा होता, की नुसते वैद्यकशास्त्रातील नव्हे तर रोगाचा, अनारोग्याचा, अशांततेचा किंवा माणसांमधील दुःखांचा इतर सर्व जीवनातील अंगांशी येणारा संबंध पाहून ते दुःख दूर करण्यासाठी जर काही कल्पना सुचली वा विचारसरणी दृढ झाली किंवा निदान सर्व सुस्पष्ट चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले तर चांगले. अशा दृष्टीने केवळ आयुर्वेदाच्या किंवा शरीराच्या आरोग्याचा विचार न ठेवता एकूणच मनुष्यत्वाचा विकास व शरीर, मन व आत्मा यांचे समत्व लाभावे व त्यासाठीच्या कल्पना मुक्तपणे लिहिता याव्यात या दृष्टीने या प्रस्तावना लिहिल्या होत्या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआयुर्वेद हा शब्दच जेव्हा मंत्र होऊन समाजात काम करू लागला तेव्हा वेगवेगळ्या निमित्ताने भेटणाऱ्या व्यक्तींनी त्यांचा आयुर्वेदावर कसा विश्वास आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला; पण आयुर्वेदावर म्हणजे नेमका कशावर विश्वास आहे? आयुर्वेद म्हणजे काय? असे प्रश्न विचारल्यानंतर त्याचे निश्चित उत्तर त्यांच्याकडून मिळू शकले नाही. एक लक्षात आले, की आयुर्वेद ही भारतीय परंपरा, भारतीय संपत्ती व भारतीय संस्कृती आहे आणि याचा सर्वांनाच अभिमान आहे. जसे अनेक संकटांना तोंड देऊन भारतीय संस्कृती टिकून राहिली तशाच पद्धतीने आयुर्वेदही टिकून आहे व तो जनसामान्यांनी घट्ट धरून ठेवलेला आहे; परंतु प्रत्यक्ष आयुर्वेदाची तपशिलात संकल्पना माहीत नसल्याने विश्वास आयुर्वेदावर पण प्रथम पसंती मात्र इतर सर्व आरोग्यव्यवस्थेवर असे परस्परविरोधी चित्र दिसू लागले. ते पाहिल्यानंतर पूर्वीच्या काळी अस्तित्वात असलेल्या, पण काळाच्या ओघात लुप्त झालेल्या, फॅमिली डॉक्टर या संकल्पनेला उचलून धरण्यासाठी 'फॅमिली डॉक्टर' ही पुस्तिका 'सकाळ'मधून प्रकाशित करण्याचे ठरले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्रातील संस्कृतीचे केंद्र असलेल्या पुणे शहरात व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात 'सकाळ' वर्तमानपत्र स्वतःची गुणवत्ता, लोकाभिमुखता, दर्जा टिकवून राहिलेले प्रमुख वर्तमानपत्र आहे. एका सामाजिक जबाबदारीतून आयुर्वेदासारख्या भारतीय पारंपरिक व भारतीयत्वात रुजलेल्या जीवनशास्त्राचा अभ्यास व्हावा, या उद्देशाने 'सकाळ'ने हे मोठे काम अंगावर घेतले. त्यातून 'फॅमिली डॉक्टर'चा उदय झाला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉक्टर किंवा वैद्यक व्यवसाय करू इच्छिणारे ज्या तऱ्हेने आयुर्वेदाचा अभ्यास करतात तीच पद्धत सर्वसामान्य लोकांना समजू शकेल असे वाटत नाही. जीवनाच्या आरोग्याचा विचार करण्याच्या दृष्टीने सर्वसामान्यांना माहीत नसलेले विषय, तसेच पूर्वी अनुभव घेतलेले विषय हसत खेळत आत्मसात करता यावेत, या दृष्टीने या प्रस्तावना लिहिण्याचा प्रयत्न केला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसर्वांनी अत्यंत प्रेमाने याचा स्वीकार केला. आमच्या जीवनात या प्रस्तावनांमुळे बदल झाले, शुक्रवारचा अंक हातात आला, की प्रथम प्रस्तावना वाचल्यानंतर पुढचा दिवस हसत-खेळत कसा जातो हे सांगणारी अनेक पत्रे आली. या सर्व प्रस्तावना केवळ आरोग्यासाठी नव्हे तर निखळ आनंदासाठी वारंवार वाचणारेही अनेक आहेत. या सर्व प्रस्तावना पुस्तकरूपाने प्रसिद्ध व्हाव्या अशी अनेक वाचकांनी इच्छा दर्शविली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eदमा, पोटदुखी वगैरे प्रत्यक्ष आयुर्वेदाशी संबंधित विषयांच्या प्रस्तावना एका भागात आणि मन, तारुण्य, प्रवास वगैरे आरोग्याशी निगडित असलेल्या इतर विषयांच्या प्रस्तावना दुसऱ्या भागात अशी वर्गवारी केली. अर्थात, या दोन्ही पुस्तकांतील प्रस्तावना वाचल्यानंतर हसत-खेळत विषय मनापर्यंत अवश्य पोहोचेल, त्याच्यावर मनन, चिंतन, चर्चा होऊन मन आनंदित झाल्यामुळेच आरोग्याचा लाभ होईल या हेतूने पुस्तकांना 'मंत्र जीवनाचा' व 'मंत्र आरोग्याचा' असे नामकरण केले. ही दोन्ही पुस्तके आज प्रसिद्ध होत आहेत याचा खूप आनंद होत आहे. या प्रस्तावना पुस्तकरूपाने प्रसिद्ध करतेवेळी पुनप्रत्ययाचा एक छान अनुभव आला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'मंत्र आरोग्याचा' व 'मंत्र जीवनाचा' ही दोन पुस्तके प्रत्यक्षात आणण्याचे मुख्य श्रेय 'सकाळ'चे श्री. अभिजित पवार, श्री. संजीव लाटकर व श्री. अभिजित मुख्य मुळ्ये यांचे आहे. तसेच पुस्तक वेळेवर प्रसिद्ध करण्यात श्री. हेमंत वंदेंकर व श्री. श्रीकांत चव्हाण व श्री. सत्यराज यादव यांचेपण सहकार्य लाभले. तसेच या पुस्तकांचे मुद्रण व वितरण या महत्त्वाच्या कार्याची जबाबदारी घेतल्याबद्दल मी 'सकाळ पेपर्स' प्रा. लि. व पुस्तकांच्या प्रकाशनाची जबाबदारी घेतल्याबद्दल 'बालाजी तांबे फाउंडेशन'चा आभारी आहे. श्रीमती विजया कोल्हे यांनी 'फॅमिली डॉक्टर' मधील प्रस्तावनांच्या टंकलेखनाचे काम केले, त्यांचेही मी आभारी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआज धनत्रयोदशी-धन्वंतरी जयंतीच्या दिवशी 'फॅमिली डॉक्टर' या साप्ताहिक पुरवणीला चार वर्षे पूर्ण होत आहेत व त्याच दिवशी या पुस्तकांचे प्रकाशन होत आहे, हा सुमंगल योग होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eश्री धन्वंतरींच्या कृपेने या मंत्रसंग्रहाचा आरोग्य व सुखसमृद्धीसाठी सर्वांनाच उपयोग व्हावा, ही प्रार्थना.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. श्री बालाजी तांबे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअश्विन वद्य त्रयोदशी, शके १९२९\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e(६ नोव्हेंबर २००७)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57228191596847,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/B8B09758-E098-4535-92D7-39D8D945D632.jpg?v=1777109485"},{"product_id":"swayampakagharatil-davakhana-natures-pharmacy-kitchen-dr-balaji-tambe","title":"स्वयंपाकघरातील दवाखाना | Nature’s Pharmacy in Your Kitchen | Dr Balaji Tambe","description":"\u003ch5\u003eमनोगत \u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वतःचे आरोग्य सांभाळावे हेच जीवनातील आद्य कर्तव्य आहे, असे भारतीय संस्कृतीने सांगितलेले आहे. आपल्या शरीरात शक्ती साठवली जाते व कार्य करण्यासाठी हीच शक्ती उपयोगात आणली जाते, तसेच प्रतिकार करण्यासाठी किंवा एखादी मोठी घटना कार्यान्वित करण्यासाठी जी शक्ती आवश्यक असते ती शरीरामार्फतच वापरावी लागते. शरीर अन्नापासून तयार होते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eघर म्हटलं की तेथे स्वयंपाकघर असते, झोपायची खोली असते, शौचकूप, स्नानघर असते, जमल्यास मुलांना खेळायला, मोठ्यांना बसायला अशी एखादी वेगळी खोली असते, सूर्याचे, आकाशाचे दर्शन घेता यावे या दृष्टीने एखादी बाल्कनी असते. स्वयंपाकघराची योजना अति प्राचीन काळापासून केलेली असे असे दिसते. मनुष्य जेव्हा गुहेत राहत होता तेव्हासुद्धा आतल्या कोपऱ्यात एका बाजूला अग्नी पेटता ठेवून स्वयंपाक करायची व्यवस्था असे. बाहेर जाऊन प्राण्याची शिकार करता यावी या साठी बाहेरच्या बाजूला काही हत्यारे टांगलेली असत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वयंपाकघरात अन्न तयार होते आणि अन्नापासून शरीर तयार होते. त्यामुळे शरीराला काही अपाय झाला किंवा शरीर नीट तयार होत नसले किंवा शरीराला वेगळ्या प्रकारे तयार करायचे असले तर याच स्वयंपाकघरातील वस्तूंचा, धान्यांचा, मसाल्यांचा उपयोग होईल हे साहजिक आहे. म्हणून स्वयंपाकघरातील दवाखाना ही कल्पना अस्तित्वात आली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वयंपाकघरात असलेल्या प्रत्येक वस्तूचा काही ना काही उपयोग असतोच. आपल्याला असे वाटते की मसाल्याच्या वस्तूंचा म्हणजे लवंग, जिरे, धणे, तिखट, हळद वगैरेंचा खास उपयोग असेल. परंतु साधे तांदळा-गव्हाचे पीठ यांचाही इलाज करण्याच्या दृष्टीने उपयोग होतो. पोटिस करण्यासाठी पीठ उपयोगात येते. एकूणच स्वयंपाकघरात असलेल्या प्रत्येक वस्तूचा औषधी उपयोग असतो. या वस्तूंचे गुणधर्म लक्षात आल्यामुळे केलेला स्वयंपाक पचनाला अधिक सोपा व संतुलित होऊ शकेल. शिवाय, खाण्यामुळे कुणाला काही किरकोळ आजार झाला तर प्राथमिक घरगुती उपचार करण्यासाठी स्वयंपाकघरातील काही वस्तूंचा उपयोग करून घेता येईल. यासाठी स्वयंपाकघरातील वस्तूंच्या गुणधर्माबद्दल नीट माहिती पाहिजे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया घरगुती उपचारांची माहिती समाजातील अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी व्याख्याने दिली; 'फॅमिली डॉक्टर' मधूनही माहिती दिली. हे करताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की आयुर्वेद हा विषय अत्यंत वैज्ञानिक व सर्वंकष आहे. या विषयात आपल्या पिण्याच्या पाण्यापासून सगळ्याबद्दल सांगितलेले आहे. हे सर्व कळल्यावर लोकांचा आयुर्वेदावरचा विश्वास वाढला. आयुर्वेदिक औषधांमुळे बरे तर वाटतेच, परंतु या उपचारांचे कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत, हेही लोकांच्या प्रकर्षाने लक्षात आले. आयुर्वेदाच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदाचे उपचार नैसर्गिक द्रव्य वापरून केले जात असल्यामुळे या उपचारांदरम्यान कुठलेही विजातीय द्रव्य शरीरात जात नाही व पुढे त्रास होत नाही. त्यामुळे स्वयंपाकघरातील दवाखान्याचा महिमा वर्णावा तेवढा कमी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात स्वयंपाकघरात असलेल्या वस्तूंची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातील बहुतांशी वस्तू सर्व जगभर असतात. काही ठिकाणी दोन-वेळा वस्तू वेगळ्या असतात. काही ठिकाणी ज्वारी वा बाजरी मिळाली नाही तर त्याहून निकृष्ट धान्य वापरलेले असते. प्रत्येक मनुष्याचे शरीर पांचभौतिक असते व त्यामुळे या पांचभौतिक शरीराला ताकद जगवण्यासाठी, देण्यासाठी सर्व ठिकाणी जवळजवळ सारख्याच स्वयंपाकाची योजना असते. त्या दृष्टीने एकाच्या स्वयंपाकघरातील दवाखाना दुसऱ्यालाही उपयोगी पडू शकतो. त्यामुळे स्वयंपाकघर हे आरोग्य टिकविणारे असून अत्यंत आवश्यक आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकाळाच्या ओघात स्वयंपाकघर हळूहळू लहान लहान होत गेल्याचे दिसते. परंतु आज लोकांना अन्नाचे महत्त्व पटल्यामुळे पुन्हा स्वयंपाकघर मोठे होऊ लागलेले आहे. बाहेरच्या खाण्यात आनंद मानण्याची प्रवृत्ती सध्या कमी होताना दिसत आहे. त्या निमित्ताने स्वयंपाकघरातील दवाखाने अधिक सुसज्ज, अधिक सोयींनी युक्त होतील ही खात्री आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch5\u003e\u003cspan\u003eडॉ. श्री बालाजी वासुदेव तांबे परिचय\u003c\/span\u003e\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआध्यात्मिक क्षेत्रात मोठा अधिकार असलेल्या वेदशास्त्रसंपन्न श्री. वासुदेव तांबे शास्त्री यांच्या घरात बडोदा येथे डॉ. श्री बालाजी तांबे यांचा जन्म झाला. आध्यात्मिक क्षेत्रात त्यांची रुची व गती उपजतच होती आणि घरातील वातावरण वेद, उपनिषदे, पुराणे, मंत्र-तंत्र यांच्या अभ्यासासाठी फारच अनुकूल होते. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच आध्यात्मिक अभ्यासाबरोबरच शालेय शिक्षणास सुरुवात करून त्यांनी अभियांत्रिकी व आयुर्वेदाचे पदवी शिक्षण पूर्ण केले. माता-पिता व सद्गुरु श्रीदत्तात्रेय यांच्या आशीर्वादामुळे दृश्य जगताबरोबरच सूक्ष्म जगताचाही अभ्यास व अनुभव घेता आला. त्यातूनच पुढे भारतीय परंपरा आणि वेद, आयुर्वेद, पुराणे, मंत्र-तंत्र, योग, ज्योतिष, संगीत यावर संशोधन करून त्यातील गूढार्थ समजून त्याचा जीवनाची विविध अंगे समृद्ध करण्यासाठी उपयोग केला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e१९६५ सालापासून 'ॐ स्वरूपा' या टोपणनावाने लेखन करून ध्यानयोग केंद्राची स्थापना केली व 'सोम' ध्यानयोग (Santulan Om Meditation yog - SOM Yog) ही ॐकार गुंजनाची दीक्षा देऊन अनेकांना आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रेरणा दिली. सध्या भारतात व परदेशात डॉ. श्री बालाजी तांबे यांची दीक्षा घेतलेला मोठा साधकवर्ग उपासना करत असतो. या सप्तरंगी ध्यानपद्धतीचे महत्त्वाचे अंग म्हणजे सामाजिक सत्कृत्य सेवा आणि सामुदायिक ध्यान प्रार्थना होय. डॉ. श्री बालाजी यांनी १९७२ पासून दर वर्षी आषाढ महिन्यात सात दिवसांचे आध्यात्मिक विषयांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणारे शिबिर घेऊन अभ्यासक्रम चालविला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'सोम' ध्यानयोग ही ध्यानपद्धती आणि 'संतुलन क्रियायोग' ही विशेष योगपद्धती श्री. बालाजी यांनी विकसित केली. आज भारतात व जगात अनेक साधक विविध केंद्रांवर या पद्धतींचा लाभ घेत आहेत. आपल्या प्राचीन ग्रंथातील ज्ञानाबरोबरच श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारत, आयुर्वेद आणि इतर भारतीय विद्या यावर गेली ४० वर्षे श्री. बालाजी प्रवचने देत आहेत. आयुर्वेद प्रचार व उपचार याबरोबरच स्वास्थ्यसंगीताचे भारतात व भारताबाहेर कार्यक्रम करून त्यांनी अनेकांना स्वास्थ्य प्रदान केले. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे सर्वंकष उपचार पद्धतीचे तंत्र डॉ. श्री बालाजी यांनी स्वतःच्या संशोधनाने व प्रयोगांनी पक्के केले आहे. आयुर्वेद आणि योगातील संयम डॉ. श्री बालाजी यांच्या रक्तात मुरलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआत्म्याचे संतुलन करायला शिकवणारी 'आत्मसंतुलन पद्धती' त्यांनी सिद्ध केलेली आहे. ही पद्धती केवळ व्याधी दूर करत नाही, तर जीवनविषयक जाण व्यापक करते. यासाठी त्यांनी १९८२ मध्ये कार्ला येथे शांत, स्वच्छ, आध्यात्मिक वातावरण असलेल्या वैदिक गुरुकुल पद्धतीच्या 'आत्मसंतुलन व्हिलेज'ची स्थापना केली. आत्म्याचे संतुलन करायला शिकवणारी जीवनपद्धती त्यांनी विकसित केली. सध्याच्या तरुण पिढीला सुद्धा अवघड आध्यात्मिक विषय सोप्या भाषेत समजावण्याचा श्री. बालाजी यांचा हातखंडा आहे. आत्मसंतुलन व्हिलेज येथे आयुर्वेदातील वर्णनानुसार औषधांच्या निर्मितीसाठी आयुर्वेदिक फार्मसी उभी केली. संगीत निव्वळ मनोरंजनासाठी नसून ती एक उपचारपद्धती आहे, असे त्यांचे मत आहे. त्या दृष्टीने त्यांनी स्वास्थ्यसंगीताच्या अनेक ध्वनिफिती तयार केल्या आहेत. निरामय शरीराबरोबरच जीवनविषयक जाण व्यापक करून मानसिक व आत्मिक आनंदाचे कारंजे त्यांनी अनेकांच्या जीवनात फुलवले. टाइम्स म्युझिक व संतुलनच्या सर्व केंद्रांवर स्वास्थ्य संगीताचे अल्बम्स उपलब्ध आहेत. यातील काही अल्बम्स लाखांच्या संख्येत लोकांनी स्वीकारले आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eभारत तसेच परदेशातील आघाडीची वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्ये डॉ. श्री बालाजींचे योग, आयुर्वेद, फलज्योतिष, स्वास्थ्यसंगीत व अध्यात्म यावर लेख नियमितपणे प्रसिद्ध होतात. त्यांची आजपर्यंत 'संतुलन क्रियायोग' (इंग्रजी व मराठी), 'घरगुती आयुर्वेदिक उपचार' (मराठी व इंग्रजी), 'लिव्हिंग मेडिटेशन थ्रू ॐ स्वरूपा ध्यानयोग' (चार भाग), रामायणाचा गूढार्थ समजवणारे 'श्रीराम विश्वपंचायतन' (मराठी) - 'आत्मरामायण' (गुजराथी), 'आयुर्वेदीय गर्भसंस्कार' (मराठी, इंग्रजी व गुजराथी), शरीरातील षट्चक्रांबद्दल माहिती देणारे 'चक्र सुदर्शन' (मराठी व गुजराथी), आयुर्वेद उवाच (भाग १, २, ३), मंत्र जीवनाचा, मंत्र आरोग्याचा, श्री गीतायोग - शोध ब्रह्मविद्येचा (भाग १ ते १५), Peacock Feathers (Part 1 \u0026amp; 2), वातव्याधी, स्त्रीआरोग्य, स्वास्थ्याचे २१ मंत्र (भाग १ व २), चमत्कार पंचकर्माचा, The Untold Secrets of Life - Purushasuktam (इंग्रजी व जर्मन), Communication with the Self - The SOM Program (इंग्रिश व जर्मन) वगैरे अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गेली अनेक वर्षे आत्मसंतुलन व्हिलेज येथून प्रकाशित होणाऱ्या 'एको' मासिकाचे ते संपादक आहेत. दैनिक 'सकाळ' या आघाडीच्या वृत्तपत्रातर्फे प्रकाशित होणाऱ्या 'फॅमिली डॉक्टर' या साप्ताहिक पुरवणीचे ते मुख्य सल्लागार आहेत. डॉ. श्री बालाजी यांनी 'साम मराठी' या वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रोज 'श्री गीतायोग-शोध ब्रह्मविद्येचा' या कार्यक्रमात श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांवर तसेच 'नमो भारतम्' या कार्यक्रमात समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आणि आयुर्वेद यावर निरूपण केले. सध्या 'श्रीकृष्णगीता-नवी दृष्टी, नवा विचार' या कार्यक्रमाद्वारे मार्गदर्शन करत आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57228260966703,"sku":null,"price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/BA157264-2935-4ED4-8E31-C31920BC2B73.jpg?v=1777113160"},{"product_id":"stri-arogya-womens-health-dr-balaji-tambe","title":"स्त्रीआरोग्य | Women's Health | Dr Balaji Tambe","description":"\u003ch5\u003eमनोगत\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003eनमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।\u003cbr\u003eनमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ।।\u003cbr\u003eप्रकृती किंवा जड याने हे सर्व ब्रह्मांड व्यापलेले आहे. प्रकृतीच्या म्हणजेच मायेच्या मदतीशिवाय परम-संकल्पना, परम-शक्ती, परम-आत्मा व्यक्तच होऊ शकत नाही. अशी जगन्माता देवी सर्वांत मोठी महाशक्ती असून ती सर्व मंगलतेचे प्रतीक व उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील महत्त्वाची आवश्यकता आहे. संपूर्ण सृजनास जबाबदार असणारी संरचना आणि समृद्धीचे, मंगलतेचे कारण असणाऱ्या देवीला नमस्कार असो. असे हे स्त्री देवीचे सर्वशक्तिमान व्यापक स्वरूप. परमचैतन्यातून व्यक्त झालेल्या सातव्या पातळीवरचे स्वर्ग - आकाश व त्यानंतर दुसऱ्या टोकावर असलेली पृथ्वी या गोष्टी आपल्याला समजतात. आकाशात चमकणारी वीज पृथ्वीवर वास्तव्य करते स्त्रीशक्ती म्हणून. स्थूलाचे, जडाचे रूपांतर होते शक्तीत व शक्तीचे रूपांतर होते जडात, परंतु त्यासाठी आवश्यक असलेले माध्यम हे स्त्रीरूपानेच प्रकट होते.\u003cbr\u003eपृथ्वी व जड ही भौतिक तत्त्वे दूषित होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामध्ये अशुद्धी अधिक प्रमाणात साठू शकते. आकाशतत्त्वाची व्यापकता अधिक असल्याने त्यात त्यामानाने अशुद्धी कमी साठते. एखादे अस्तित्व जेवढे छोटे व मर्यादित स्वरूपात असेल तेवढे त्यामध्ये दोष लवकर निर्माण होऊ शकतात. आकाशात किंवा हवेत असलेल्या प्रदूषणामुळे अग्नी दूषित होतो तसेच पृथ्वी व जलातील प्रदूषण आकाशतत्त्वावर वा वातावरणावर परिणाम करते.\u003cbr\u003eस्त्रीला स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी शुद्धतेचे अधिक नियम पाळावे लागतात. सृजनाची संकल्पना पार पाडायची असल्यामुळे स्त्रीचे शरीर अत्यंत नाजूक बनविलेले असते. गर्भाशयात असताना बाळाला कुठल्याही तऱ्हेने काठिण्याचा त्रास होऊ नये किंवा त्याच्यावर दाब येऊ नये अशा तऱ्हेने तिच्या शरीरात गर्भाशयाची योजना केलेली असते. सृजनाची प्रक्रिया पृथ्वी, बीज व अग्नी यांच्या संयोगातून घडत असल्यामुळे अत्यंत गुंतागुंतीची रचना असलेल्या प्रजननसंस्थेची काळजी घेणे अत्यावश्यक असते. या संपूर्ण संस्थेवर नियंत्रण असणारा अग्नी म्हणजेच हार्मोन्स हे मानसिकतेशी जोडलेले असल्यामुळे मुळातच असलेल्या नाजूक भावनांची काळजी घेणे या सर्व गोष्टी ओघानेच बंधनकारक ठरतात. नाजूकपणा, सुवास, सौंदर्य आणि निसर्गाला गतिमान ठेवण्यासाठी प्रजोत्पादनाची शक्यता या सर्व गोष्टी ज्या स्त्रीच्या ठिकाणी असतात ती स्त्री आकर्षणाचे कारण ठरली तर त्यात नवल नाही. यामुळे स्त्रीला जसे महत्त्वाचे स्थान मिळते, तसेच तिला संकटांनाही सामोरे जावे लागते.\u003cbr\u003eविश्वचक्र सतत व व्यवस्थित चालू राहावे अशी आवश्यकता असते. स्त्रीआरोग्य, स्त्रीसंतुलन हा विषय महत्त्वाचा ठरतो तो यामुळेच. स्त्रीसौष्ठव, स्त्रीचे आरोग्य, स्त्री- शरीरातील अग्नीचे संतुलन म्हणजेच तिच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन ठेवण्याकडे सर्वतोपरी काळजी घ्यावी लागते. मासिक धर्म, गर्भधारणा, बालकाला जन्म देणे, बालकाला स्तनपान करून त्याला वाढवणे अशा सर्व जबाबदाऱ्या तिला पार पाडायच्या असल्याने तिचे आरोग्य टिकविण्याची नितांत गरज असते. त्यासंबंधीची माहिती, काळजी व उपचार योजना या पुस्तकात थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे.\u003cbr\u003eफार प्राचीन काळापासून स्त्रीआरोग्याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केलेले दिसतात. रामायणामध्ये स्त्रीहट्ट पुरविणे, कौसल्येचे डोहाळे पुरविणे, सीता गर्भवती असताना तिच्या इच्छा पुरविणे, तिच्या अग्निसंतुलनासाठी उपयोगी ठरलेले अशोकवन, तसेच महाभारतात स्त्रीच्या इच्छेविरुद्ध उत्पन्न झालेल्या संततीत आलेले दोष आणि द्रौपदीचे महत्त्व वगैरे गोष्टी सर्वांच्या परिचयाच्या आहेत.\u003cbr\u003eकोरफड (कुमारी) व अशोक हे स्त्रीचे जवळचे दोन वनस्पती मित्र. तसेच अनंत आणि शतावरी याही वनस्पती स्त्रीसाठी अत्यंत उपयोगी असतात. स्त्रीच्या गर्भाशयासंबंधीच्या तक्रारी व तिचे अग्निसंतुलन कुमारीने साधता येते, तसेच तिचे मासिक धर्माच्या तक्रारी अशोकाच्या मदतीने दूर करता येतात. तिच्या शरीराचा मऊपणा, सौष्ठव, कांती यासाठी शतावरी व अनंत या वनस्पती उपयोगी ठरतात.\u003cbr\u003eस्त्रीच्या आरोग्याची काळजी म्हणजेच तिच्या भावनांची व मासिक धर्माची काळजी. त्या दृष्टीने प्रथमपासूनच काळजी घेतली तर असंतुलनापासून दूर राहता येते अर्थात रोगांपासून चार हात दूर राहता येते. एखाद्या तरुण स्त्रीचे आरोग्य बरोबर नसल्यास त्याची जबाबदारी काही प्रमाणात तिच्या आईवर, पर्यायाने स्त्रीवरच असू शकते. स्त्रीने स्वतःची काळजी घेतली की तिच्यापासून होणारी संततीही सुदृढ व बुद्धिमान होऊ शकते. तिला मुलगी झाली की तिचे आरोग्य चांगले राहून ती पुढे चांगल्या संततीला जन्म देऊ शकते; आणि मुलगा झाला तर उत्तम प्रतीचे वीर्य व पुंबीज देऊन शूर, बुद्धिमान, सुदृढ अपत्याचा जन्म होऊ शकतो.\u003cbr\u003eएकंदरीत हा विषय खूप मोठा आहे. त्यापैकी दैनंदिन जीवनात समोर येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि साधारणतः स्त्रीचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती या पुस्तकात आहे. या पुस्तकाचा स्त्रीला तर फायदा होईलच, पण पुरुषांनीही हे पुस्तक अवश्य वाचावे, जेणेकरून त्यांच्या कुटुंबात समाविष्ट असणाऱ्या स्त्रियांची काळजी घेणे त्यांना अधिक चांगल्या प्रकारे घेता येईल.\u003cbr\u003eबालाजी तांबे\u003cbr\u003eआत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला\u003cbr\u003eएप्रिल २०१२\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57228308119855,"sku":null,"price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/10713CC5-1F41-4080-8316-21B676C2012B.jpg?v=1777115302"},{"product_id":"arogya-uvach-bhag-1-truth-about-health-dr-balaji-tambe","title":"आरोग्य उवाच भाग १ | Truth about Health | Dr Balaji Tambe","description":"\u003ch5\u003eमनोगत\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003eडॉक्टरांकडे रुग्ण जातो तो जरासा शारीरिक त्रास होईल तेव्हा.तरीही रुग्ण आयुर्वेदिक डॉक्टरांकडे लगेचच जाईल असे नाही. सर्दी, ताप, जुलाब, पोटदुखी वगैरे साध्या साध्या विकारांवर रोग मुळांतून बरा करण्यापेक्षा रोगाची लक्षणे कमी करणाऱ्या उपचारांवर भर असल्याचे दिसते. लक्षणे कमी करण्याच्या दृष्टीने चटकन गुण येईल अशी औषधे घेण्याकडे कल असलेला दिसतो. चिवट, चिकट व लवकर बरे न होणारे रोग असताना वेदना कमी करण्यासाठी घेतली जाणारी औषधे दिवसेंदिवस लागू पडेनाशी होतात व त्यामुळे त्रास वाढू शकतात. अगदीच काही गुण येत नाही अशा वेळी रुग्ण आयुर्वेदिक इलाजपद्धतीकडे वळताना दिसतात. शल्यकर्म करून तसेच खूप महागडे औषधोपचार करूनही अपेक्षित गुण न आल्यामुळे रुग्ण बऱ्याच वेळा आयुर्वेद वा होमिओपॅथीकडे वळताना दिसतो. त्याचप्रमाणे अमुक एक चमत्कारी व्यक्ती, अमुक एका दिवशी, कोठल्यातरी आडगावात, काही विशिष्ट औषध देतो असे ऐकल्यावरून तेही उपाय याच्या आधी करून झालेले असतात.\u003cbr\u003eआयुर्वेद ही एक सर्वंकष उपचारपद्धती असल्यामुळे त्यात रुग्णाचाच नव्हे तर सर्व कुटुंबाचा, रोगाचाच नव्हे तर रुग्णाच्या प्रकृतीचा, लहानपणापासून झालेल्या सर्व शारीरिक अवस्थांचा, वंशपरंपरागत असलेल्या त्याच्या इतिहासाचा अभ्यास करून औषध देण्याची पद्धत आहे. हे सर्व पाहून अशाच प्रकारे सर्व प्रकारची माहिती घेऊन उपचार करणाऱ्या फॅमिली डॉक्टरची आठवण झाली व 'सकाळ' वर्तमानपत्रासोबत येणाऱ्या 'फॅमिली डॉक्टर' या साप्ताहिक पुरवणीची सुरुवात झाली.\u003cbr\u003eआयुर्वेदाची संपूर्ण शास्त्रशुद्ध माहिती आयुर्वेदाच्या पारिभाषिक शब्दांतून वा वैद्यकीय क्षेत्रात प्रचलित असलेल्या संकल्पनेनुसार दिली, तर ती सर्वसामान्यांना कळणे दुरापास्त होईल हे लक्षात घेऊन सामान्यांना कळेल अशा घरगुती भाषेत आयुर्वेदाचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा परिपाठ ठेवला. यामुळे सर्वसामान्यांना आयुर्वेदाची व्याप्ती लक्षात येण्यास मदत झाली. त्रास झाल्यास सर्वप्रथम आयुर्वेदाकडे जावे व गरज पडल्यास शल्यकर्म वा इतर चिकित्सेची मदत घ्यावी ही संकल्पना समजू शकली.\u003cbr\u003e'फॅमिली डॉक्टर'मध्ये आयुर्वेदाचा इतिहास थोडक्यात सांगितल्यानंतर आयुर्वेद ही केवळ एक भौतिक वा रसायन चिकित्सा नसून त्यात मनुष्याचा स्वभाव, मन, आत्मा यांनाही समाविष्ट केलेले असल्याने या सर्व शक्तींचे संचलन करणारी शक्ती व देवतांची ओळख करून दिल्यानंतर आयुर्वेदातील संकल्पना समजावण्यासाठी सुरुवात केली. आयुर्वेदातील वात, पित्तादी दोष व रस, रक्तादी धातूंविषयी माहिती घेताना लक्षात आले की या संकल्पनांची रोजच्या व्यवहारातील शब्दांबरोबर गल्लत होऊ शकते व गैरसमज वाढू शकतात. तेव्हा आयुर्वेदाच्या या संकल्पना नुसत्या शब्दांनी न समजावता त्यांना रोजच्या व्यवहारातील उदाहरणे घेऊन एका वेगळ्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न 'आयुर्वेद उवाच' या लेखमालेतून केला. याचा उपयोग केवळ सर्वसामान्यांनाच नव्हे तर आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना व डॉक्टरांनाही झाला. हे सदर वाचल्यानंतर आयुर्वेदाचे ज्ञान केवळ शब्दात राहिलेले नसून त्याचा अनुभव घेण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरले.\u003cbr\u003e'आयुर्वेद उवाच' मध्ये विषय समजावत असताना शास्त्राबाहेर तर जायचे नाही, शास्त्राने जे सांगितले आहे तेच सांगायचे. पण त्यातील संकल्पना समजावत असताना भाषा सोपी व व्यवहारातील वापरावी असे धोरण ठेवले. 'आयुर्वेद उवाच' ह्या सदरातून आयुर्वेद सर्वांना कळेल अशा भाषेत लिहिला गेला. इतकेच नाही तर एखादे पाठ्यपुस्तक असावे अशा पद्धतीने विषय विद्यार्थ्यांनाही उपयोगी पडला. अशा रीतीने अनेकांना याचा उपयोग होतो आहे हे पाहिल्यावरून 'आयुर्वेद उवाच' हे पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरविले.\u003cbr\u003eपहिल्या भागात आरोग्यरक्षणाच्या दृष्टीने आयुर्वेदाने सांगितलेले स्वस्थवृत्त, दिनचर्या, ऋतुचर्या वगैरे विषय अगदी साध्या भाषेत मांडले. नुसते मांडले असे नाही तर ते प्रत्यक्ष जीवनात कसे आणायचे याचेही मार्गदर्शन केले. वैद्याला रुग्णावर उपचार करत असताना उपयोग होईल, तसेच रुग्णालाही पूर्ण उपचार मिळतील असा विषय क्रमांकाने समजावला गेला. आयुर्वेदातील 'पिंडी ते ब्रह्मांडी' ह्या संकल्पनेनुसार जे काही शरीरात आहे तेच ब्रह्मांडात आहे व जे ब्रह्मांडात आहे तेच शरीरात आहे. सर्व विश्व ज्यांच्यातून तयार झाले ती पंचमहाभूतद्रव्ये सर्वांमध्ये सारखीच असतात. पृथ्वी म्हटल्यांनतर आपण राहतो ती पृथ्वी लोकांच्या डोळ्यासमोर येणे साहजिक आहे. मातीत थोडे पाणी मिसळल्यानंतर तयार होणाऱ्या चिखलापासून एखादी मूर्ती बनवायची असल्यास चिखल एक विशिष्ट मर्यादित घट्ट असणे तसेच त्यात योग्य चिकटपणा असणे आवश्यक असते. एखादी मूर्ती बनविण्यासाठी आत कठीण वस्तूचा सांगाडा असावा लागतो, अन्यथा मूर्ती लोळागोळा होऊन कोसळते. तसेच शरीरावर मांस वगैरे टिकावे म्हणून आत हाडांचा सांगाडा असतो. पृथ्वी म्हणजे माती व जलतत्त्व म्हणजे पाणी असा समज होण्याची शक्यता असते. पण पंचमहाभूतातील पृथ्वीतत्त्व म्हणजे केवळ माती असा अर्थ नसून ही संज्ञा सर्व जडवस्तूंसाठी लागू असते व जडत्व ही संकल्पना महत्त्वाची असते. लवचिकपणा, प्रवाहीपणा, वरून खाली वाहणे अशी जलतत्त्वाची संकल्पना आहे. अशा प्रकारे आयुर्वेदीय संकल्पनांची उकल समजावली गेल्याने आयुर्वेद हा विषय समजणे सोपे होऊ शकले. पंचतत्त्व व पंचीकरणानंतर त्रिदोष, सप्तधातू, मल, अग्नी तसेच द्रव्यगुण आणि दर्शनशास्त्र हे विषय मांडण्यात आले.\u003cbr\u003eएकंदरीत 'आयुर्वेद उवाच' हा विषय अनेक भागांतून पुस्तकरूपाने देण्याचे ठरले. त्यापैकी हे पहिले पुस्तक सर्वसामान्यांना व विद्यार्थ्यांनाही उपयोगी व्हावे ही प्रार्थना.\u003cbr\u003eडॉ. श्री बालाजी तांबे\u003cbr\u003eआत्मसंतुलन व्हिलेज\u003cbr\u003eकार्ला ४१० ४०५\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57228352749871,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/D684EE0D-5600-4A29-9800-2140726567F2.jpg?v=1777116006"},{"product_id":"vatvyadhi-diseases-of-vata-dr-balaji-tambe","title":"वातव्याधी | Diseases of Vata | Dr Balaji Tambe","description":"\u003ch5\u003eमनोगत\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e'फॅमिली डॉक्टर' ह्या पुरवणीला जवळजवळ आठ वर्षे पूर्ण होत आहेत. आरोग्याची देवता असलेल्या धन्वंतरीजयंतीचा म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवसाचा मुहूर्त धरून सुरू केलेल्या ह्या पुरवणीचे जवळजवळ ४१६ अंक पूर्ण झाले. वाचकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे ह्या अंकांमधील प्रस्तावना, मुखपृष्ठकथा, आयुर्वेद उवाच ह्या सर्व सदरांमध्ये लिहिताना अतिशय आनंद मिळाला, इतकेच नव्हे तर एखाद्या शुक्रवारी सकाळ वर्तमानपत्राच्या कार्यालयाला सुटी असल्याने अंक निघणार नसला तर चुकल्याचुकल्यासारखे होत असे, चैन पडत नसे. आयुर्वेदाचा, आयुर्वेदीय उपचारांचा, एकूणच आयुर्वेदिक पद्धतीचा, औषधांचा सर्वसामान्यांना उपयोगी पडेल असा परिचय सोप्या भाषेत देत असताना आयुर्वेदाच्या तत्त्वांची कास धरूनच सर्व लिखाण करण्याचा पायंडा ठेवला. हे लिखाण करताना सर्वसामान्यांना तसेच वैद्य होऊ इच्छिणाऱ्यांना कळेल व उपयोगी पडेल अशी भाषा वापरण्याचे ठरविले व तसे केले. त्यामुळेच ह्या पुरवणीत असलेल्या लेखांचा सर्वसामान्यांपासून ते अभ्यासू वृत्तीने आयुर्वेद शिकणाऱ्यांपर्यंत सर्वांनाच लाभ झाला.\u003cbr\u003eसुरुवातीच्या दीड-दोन वर्षांनंतर प्रसिद्ध केलेल्या, 'फॅमिली डॉक्टर'मधील महत्त्वाच्या लेखांचा समावेश असलेल्या 'निवडक फॅमिली डॉक्टर' ह्या पुस्तकाला भरपूर प्रतिसाद मिळतो आहे. गेल्या ५-६ वर्षांच्या कालावधीत अनेक गावांमध्ये अनेक मंडळी भेटली. त्यांनी शुक्रवारी येणाऱ्या 'फॅमिली डॉक्टर' ह्या पुरवण्यांचा कसा संग्रह केलेला आहे, सर्व पुरवण्या कशा जपून ठेवलेल्या आहेत हे दाखवले. त्यासाठी घरातील कपाटात विशेष योजना केलेली दाखवली. काही व्यक्तींनी त्यांच्याकडे एखादा अंक नसल्यामुळे त्याच्या दुसऱ्या प्रतीबद्दल विचारणा केली. अशा तऱ्हेने 'फॅमिली डॉक्टर' ही एक पुरवणी न राहता 'फॅमिली डॉक्टर'ला लोकांनी संग्राह्य ग्रंथ ह्या रूपाने स्वीकारलेले आहे हे लक्षात आले. आयुर्वेदावर कार्यक्रम, व्याख्याने आयोजित केल्यावर अनेक वेगवेगळ्या विषयांवर बोलले जाते, पण एखाद्याला विशिष्ट रोगाचा त्रास होत असल्यास लोकांना त्यांच्या विशिष्ट रोगाबद्दल व उपचारांबद्दल माहिती हवी असते.\u003cbr\u003eरोग होऊच नये म्हणून आयुर्वेदाचा प्रचार करावा हा उद्देश मी डोळ्यासमोर ठेवलेला आहे. त्या दृष्टीने प्रत्यक्ष रोग होण्यासाठी कोठल्या चुका कारणीभूत होतात हे सांगण्याचा प्रयत्न केला. काळजी घेऊनही एखादा रोग झालाच तर त्यावर कोठले घरगुती उपचार करता येतात, त्या रोगाबद्दलची संपूर्ण माहिती मिळावी, रोगावर कुठला, कसा व किती प्रमाणात उपचार करून घ्यावा, रोग झाला असल्यास कुठले पथ्यापथ्य सांभाळावे हे कळणे आवश्यक असते. त्या दृष्टीने आत्तापर्यंत 'फॅमिली डॉक्टर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन करून रोगानुसार छोट्या छोट्या पुस्तिका प्रकाशित करण्याचे ठरविले.\u003cbr\u003e'फॅमिली डॉक्टर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वातविकारावरच्या प्रस्तावना, मुखपृष्ठकथा व विषयाला संबंधित आयुर्वेद उवाच ह्या सदरातील लेख संकलित करून 'वातव्याधी' ही पहिली पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे. आजच्या काळात दगदगीमुळे किंवा स्वतःच्या स्वभावामुळे मनुष्य अतिशय धावपळ करतो, निसर्गाला धरून आहार-विहार सांभाळले जात नाहीत, काही वेळा प्रवास, जागरणे अपरिहार्य असतात, अशा वेळी शरीरात पित्त वाढून अनेक प्रकारचे पचनाचे विकार तर होतातच पण बरोबरीने हार्मोन्सचे असंतुलन होते. त्याचबरोबर वातदोषाचे असंतुलन होईल अशा आहार-विहारामुळे वातदोष आणि वातविकार वाढतात. प्रत्येक विकारात होणारे 'दुखणे' व शारीरिक हालचालींवर येणारे बंधन हेच आजारपणात मुख्यतः त्रासदायक ठरते.\u003cbr\u003eतसेही वाढत्या वयाबरोबर म्हणजे आयुष्याच्या उत्तरार्धात प्रकृतीमध्ये वातदोष उत्पन्न होऊ लागतो त्यामुळेही अनेकांना वातविकारांना सामोरे जावे लागते. अशा दृष्टीने वातविकारांची संप्राप्ती, वातविकारांवरचे उपचार समजून घ्यावेत ह्या दृष्टीने ही पुस्तिका प्रकाशित होत आहे. साधारणतः सर्व प्रकारचे, परिचयाचे व सर्वसामान्यपणे आढळणारे सर्व वातविकार याबद्दल माहिती, औषधोपचार, ह्या पुस्तिकेतून मिळू शकेल अशी आशा आहे. वातविकारामुळे त्रास होणाऱ्यांची, विकारातून व दुःखातून मुक्तता मिळावी अशी प्रार्थना.\u003cbr\u003eवात ह्या शब्दाचा साधारणतः अर्थ वायू असा घेतला जातो. त्यामुळे 'हा वातविकार आहे' असे रुग्णाला सांगितले की बऱ्याच वेळेला रोगी म्हणतो 'मला वाताचा काही त्रास नाही, मला पोटात वायू धरत नाही, मला गॅस सरत नाही.' वातदोषात वायू व आकाश ह्या दोन पंचमहाभूतांचा समावेश असला तरी वातदोष म्हणजे केवळ वायू नव्हे. पोटात धरणारा वायू असा वातदोष ह्या शब्दाचा अर्थ नव्हे.\u003cbr\u003eवात, पित्त आणि कफ ह्या आयुर्वेदातील संकल्पना आहेत. शरीरधारणेसाठी आवश्यक असणाऱ्या तत्त्वांचा विचार करता जडतत्त्व व त्या जडतत्त्वाचे चलनवलन व्हावे म्हणून असलेले जलतत्त्व ही दोन तत्त्वे मिळून जी संकल्पना तयार होते तिला 'कफ' असे नाव दिलेले आहे. कफदोष असे म्हणत असताना त्याचा अर्थ छातीत होणारा कफ असा नसतो. 'पित्त' ही संकल्पना जल, अग्नी व वायू ह्या तीन पंचमहाभूतांपासून तयार होते. आवश्यक त्या ठिकाणी 'तेज' पोहोचविणे हे पित्ताचे कार्य होय. वात, पित्त आणि कफ ह्यात वयोमान, ऋतुमान व आहारविहार ह्यामुळे बदल व असंतुलन होते म्हणून त्यांना वातदोष वगैरे संज्ञा दिल्या जातात.\u003cbr\u003eशरीराच्या आत व बाहेर होणाऱ्या चलनवलनाला लागणारी संकल्पना म्हणजे वात. हात-पाय जास्त हलणे किंवा अजिबात न हलणे, शरीराला जडत्व येणे किंवा कंप येणे, डोळ्याच्या पापणीची सारखी उघडझाप होणे, सही करताना हात थरथरणे, हातात पेन धरता न येणे, मनगटे वळवता न येणे, हात वर उचलता न येणे किंवा शरीरात कोठेही, विशेषतः सांध्यांमध्ये वेदना होणे अशी सर्व लक्षणे वातदोषाच्या असंतुलनातून तयार होतात, हे लक्षात ठेवले तर पुढे सर्व विषय समजणे सोपे होईल.\u003cbr\u003eप्रत्येक शुक्रवारी प्रसिद्ध होणाऱ्या 'फॅमिली डॉक्टर' ह्या पुरवणीसाठी व ह्या पुस्तकासाठी ध्वनिमुद्रित केलेला विषय टाइप करणे हे अवघड काम विजया कोल्हे ह्या करतात, त्यांचे मनःपूर्वक आभार, तसेच डॉ. भाग्यश्री झोपे हिच्या साहाय्याबद्दल तिचे मनःपूर्वक आभार.\u003cbr\u003eबाळाजी तांबे\u003cbr\u003eआत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला\u003cbr\u003eऑक्टोबर २०११\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57228419039535,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/5DAB32F5-B475-4296-9452-4A9D407945AA.jpg?v=1777117872"},{"product_id":"santulan-kriyayog-yoga-balanced-action-dr-balaji-tambe","title":"संतुलन क्रियायोग | The Yoga - Balanced Action| Dr Balaji Tambe","description":"\u003ch5\u003eमनोगत\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003eआजकाल अनेकांना रोजच्या दिनक्रमात योगाभ्यासाचा अंतर्भाव करायची इच्छा असते. पण आजच्या गतिमान आयुष्यात, जीवनाचा अर्थ व हेतू शोधण्यासाठी पुरेसे महत्त्व न दिल्यामुळे अनेक जण योगाभ्यासासाठी योग्य तेवढा वेळ देऊ शकत नाहीत असे दिसते. शारीरिक व्याधींनी ग्रस्त असूनसुद्धा माझे काही रुग्ण आसने व प्राणायाम करू इच्छित होते. या सर्वांची अडचण लक्षात आल्याने इसोटेरिक क्रियायोगातील संदर्भ घेऊन मी संतुलन क्रियायोगाची रचना केली. हठयोगातील आसने व प्राणायाम (शरीरस्वास्थ्यासाठी खूप चांगला उपयोग होत असल्याने) यांचा संदर्भ घेऊन 'संतुलन क्रियायोग - स्काय' (Santulan Kriya Yog - SKY), 'संतुलन क्रियायोग आसन - स्काय आसन' आणि 'संतुलन भस्त्रिका - स्काय भस्त्रिका' यांची रचना करण्यात आली आहे. संतुलन क्रियायोग सहजपणे शिकून त्याचा अभ्यासही सहजपणे करता येतो.\u003cbr\u003eसंतुलन क्रियायोगाची प्रथम ओळख करून दिल्यानंतर सर्व वयोगटांत त्याचा प्रसार लगेचच झाला. 'संतुलन क्रियायोग'च्या परिणामांबद्दल मी सखोल संशोधन केले. हे परिणाम खूपच आशादायक असल्याने मी केंद्रात राहून पंचकर्म करणाऱ्या रुग्णांच्या दैनंदिन कार्यक्रमात संतुलन क्रियायोगाचा समावेश केला. याचे योग्य ते परिणाम दिसल्याने महिन्याच्या उपचारानंतर इथून घरी गेल्यावरसुद्धा अनेकांनी संतुलन क्रियायोगाचा अभ्यास सुरू ठेवला असल्याचे कळविले.\u003cbr\u003eगेल्या अनेक वर्षांत संतुलन क्रियायोगाच्या परिणामांबद्दल अनेकांनी आपले मत कळवले आहे. संतुलन क्रियायोग शिकणे खूप सोपे आहे, 'याचा दैनंदिन आयुष्यात सहज समावेश करता येतो', 'अनेक वर्षे याचा अभ्यास विनासायास करणे शक्य आहे' या व अशा तऱ्हेच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. अलीकडेच युरोपमध्ये कार्यशाळा घेण्यासाठी गेलो असता, लंडनमध्ये ८० वर्षांच्या एका महिलेशी माझी गाठ पडली. अनेक वर्षांपूर्वी त्या पुण्यात आल्या असता माझ्याकडून संतुलन क्रियायोग शिकल्या होत्या. 'मी अजूनही रोज संतुलन क्रियायोगाचा अभ्यास करते; मला त्याचा खूप चांगला उपयोग झालेला आहे' असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले आणि मोठ्या उत्साहाने संतुलन क्रियायोगातील स्थैर्य ही क्रिया कार्यशाळेसाठी जमलेल्या सर्व मंडळींसमोर करून दाखवली.\u003cbr\u003eसारांशाने सांगायचे म्हटले तर, संतुलन क्रियायोगाचा अभ्यास करणाऱ्यांना खूप उपयोग झालेला दिसतो, प्रकृतीमध्ये काही बिघाड झालेला असतानासुद्धा याचा अभ्यास सहजतेने करता येतो व त्याचे उत्तम फायदे होताना दिसतात. संतुलन क्रियायोगाचा आपल्या दैनंदिन कार्यक्रमात समावेश केलेल्यांना उत्तम शरीरस्वास्थ्य बरोबरच सर्जनात्मकता व मनाची शांतीही मिळते.\u003cbr\u003eसंतुलन क्रियायोग या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध झाल्या आहेत. 'हे पुस्तक मराठीत असावे' अशी मागणी अनेकांनी सातत्याने केल्याने संतुलन क्रियायोग या पुस्तकाची मराठी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात येत आहे.\u003cbr\u003eबाळाजी तांबे\u003cbr\u003eआत्मसंतुलन व्हिलेज\u003cbr\u003eकार्ला, नोव्हेंबर २०१०\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57228455248175,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/DFB82C5D-009C-4DE5-9151-8020EE2436D9.jpg?v=1777118563"},{"product_id":"chakra-sudarshan-dr-balaji-tambe","title":"चक्र सुदर्शन | ChakraSudarshan | Dr Balaji Tambe","description":"\u003ch5\u003eलेखक परिचय\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eडॉ. श्री बालाजी वासुदेव तांबे\u003cbr\u003eआध्यात्मिक क्षेत्रात मोठा अधिकार असलेल्या वेदशास्त्रसंपन्न श्री. वासुदेव तांबेशास्त्री यांच्या घरात बडोदा येथे डॉ. श्री बालाजी तांबे यांचा जन्म झाला. आध्यात्मिक क्षेत्रात त्यांची रुची व गती उपजतच होती आणि घरातील वातावरण वेद, उपनिषदे, पुराणे, मंत्र-तंत्र यांच्या अभ्यासासाठी फारच अनुकूल होते. वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच आध्यात्मिक अभ्यासाबरोबरच शालेय शिक्षणास सुरुवात करून त्यांनी अभियांत्रिकी व आयुर्वेदाचे पदवी शिक्षण पूर्ण केले. माता-पिता व सद्गुरु श्रीदत्तात्रेय यांच्या आशीर्वादामुळे दृश्य जगताबरोबरच सूक्ष्म जगताचाही अभ्यास व अनुभव घेता आला. त्यातूनच पुढे भारतीय परंपरा आणि वेद, आयुर्वेद, पुराणे, मंत्र-तंत्र, योग, ज्योतिष, संगीत यावर संशोधन करून त्यातील गूढार्थ समजून त्याचा जीवनाची विविध अंगे समृद्ध करण्यासाठी उपयोग केला.\u003cbr\u003e१९६५ सालापासून ‘ॐ स्वरूपा’ या टोपणनावाने लेखन करून ध्यानयोग केंद्राची स्थापना केली व ‘सोम’ ध्यानयोग (Santulan Om Meditation yog - SOM Yog) ही ॐकार गुंजनाची दीक्षा देऊन अनेकांना आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रेरणा दिली. सध्या भारतात व परदेशात डॉ. श्री बालाजी तांबे यांची दीक्षा घेतलेला मोठा साधकवर्ग उपासना करत असतो. या सप्तरंगी ध्यानपद्धतीचे महत्त्वाचे अंग म्हणजे सामाजिक सत्कृत्य सेवा आणि सामुदायिक ध्यान प्रार्थना होय. डॉ. श्री बालाजी यांनी १९७२ पासून दर वर्षी आषाढ महिन्यात सात दिवसांचे आध्यात्मिक विषयांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणारे शिबिर घेऊन अभ्यासक्रम चालविला.\u003cbr\u003e‘सोम’ ध्यानयोग ही ध्यानपद्धती आणि ‘संतुलन क्रियायोग’ ही विशेष योगपद्धती श्री. बालाजी यांनी विकसित केली. आज भारतात व जगात अनेक साधक विविध केंद्रांवर या पद्धतींचा लाभ घेत आहेत. आपल्या प्राचीन ग्रंथातील ज्ञानाबरोबरच श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारत, आयुर्वेद आणि इतर भारतीय विद्या यावर गेली ४० वर्षे श्री. बालाजी प्रवचने देत आहेत. आयुर्वेद प्रचार व उपचार याबरोबरच स्वास्थ्यसंगीताचे भारतात व भारताबाहेर कार्यक्रम करून त्यांनी अनेकांना स्वास्थ्य प्रदान केले. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे सर्वंकष उपचार पद्धतीचे तंत्र डॉ. श्री बालाजी यांनी स्वतःच्या संशोधनाने व प्रयोगांनी पक्के केले आहे. आयुर्वेद आणि योगातील संयम डॉ. श्री बालाजी यांच्या रक्तात मुरलेला आहे.\u003cbr\u003eआत्म्याचे संतुलन करायला शिकवणारी ‘आत्मसंतुलन पद्धती’ त्यांनी सिद्ध केलेली आहे. ही पद्धती केवळ व्याधी दूर करत नाही, तर जीवनविषयक जाण व्यापक करते. यासाठी त्यांनी १९८२ साली कार्ला येथे शांत, स्वच्छ, आध्यात्मिक वातावरण असलेल्या वैदिक गुरुकुल पद्धतीच्या ‘आत्मसंतुलन व्हिलेज’ची स्थापना केली. आत्म्याचे संतुलन करायला शिकवणारी जीवनपद्धती त्यांनी विकसित केली. सध्याच्या तरुण पिढीला सुद्धा अवघड आध्यात्मिक विषय सोप्या भाषेत समजावण्याचा श्री. बालाजी यांचा हातखंडा आहे. आत्मसंतुलन व्हिलेज येथे आयुर्वेदातील वर्णनानुसार औषधांच्या निर्मितीसाठी आयुर्वेदिक फार्मसी उभी केली. संगीत निव्वळ मनोरंजनासाठी नसून ती एक उपचारपद्धती आहे, असे त्यांचे मत आहे. त्यादृष्टीने त्यांनी स्वास्थ्यसंगीताच्या अनेक ध्वनिफिती तयार केल्या आहेत. निरामय शरीराबरोबरच जीवनविषयक जाण व्यापक करून मानसिक व आत्मिक आनंदाचे कारंजे त्यांनी अनेकांच्या जीवनात फुलवले.\u003cbr\u003eभारत तसेच परदेशातील आघाडीची वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्ये डॉ. श्री बालाजींचे योग, आयुर्वेद, फलज्योतिष, स्वास्थ्यसंगीत व अध्यात्म यावर लेख नियमितपणे प्रसिद्ध होतात. त्यांची आजपर्यंत ‘संतुलन क्रियायोग’ (इंग्रजी), ‘घरगुती आयुर्वेदिक उपचार’ (मराठी व इंग्रजी), ‘लिव्हिंग मेडिटेशन थ्रू ॐ स्वरूपा ध्यानयोग’ (चार भाग), रामायणाचा गूढार्थ समजवणारे ‘श्रीराम विश्वपंचायतन’, ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’, शरीरातील षट्चक्रांबद्दल माहिती देणारे ‘चक्र सुदर्शन’, आयुर्वेद उवाच (भाग १, २ व ३) श्री गीतायोग - शोध ब्रह्मविद्येचा (भाग १ ते १०), Peacock Feathers (Part 1 \u0026amp; 2), वातव्याधी, स्त्रीआरोग्य, स्वास्थ्याचे २१ मंत्र (भाग १ व २), The Untold Secrets of Life - Purushasuktam (इंग्रजी व जर्मन) वगैरे अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गेली अनेक वर्षे आत्मसंतुलन व्हिलेज येथून प्रकाशित होणाऱ्या ‘एको’ मासिकाचे ते संपादक आहेत. दैनिक सकाळ या आघाडीच्या वृत्तपत्रातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘फॅमिली डॉक्टर’ या साप्ताहिक पुरवणीचे ते मुख्य सल्लागार आहेत. डॉ. श्री बालाजींनी ‘साम मराठी’ या वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रोज ‘श्री गीतायोग-शोध ब्रह्मविद्येचा’ या कार्यक्रमात श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांवर निरूपण केले. सध्या ‘नमो भारतम्’ या कार्यक्रमात समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आणि आयुर्वेद यावर निरूपण चालू आहे.\u003c\/p\u003e\n\u003ch5\u003e\n\u003cbr\u003eप्रस्तावना\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eविज्ञानाचा अभ्यास हे माझ्या आजवरच्या वाटचालीचे महत्त्वाचे अंग राहिलेले आहे. त्यामुळेच मी आधी अभियंता झालो आणि नंतर डॉक्टर. परंतु, विज्ञान हे केवळ भौतिक वस्तूंपुरते मर्यादित नाही. नीट समजून घेतले तर त्याहीपलीकडे असणारी त्याची व्याप्ती आपल्या लक्षात येते. शरीराचे जसे शास्त्र आहे, तसे अंतर्मनाचे, अंतर्चक्षूंचे, अनुभूतीचे - थोडक्यात अध्यात्माचेही एक क्षेत्र आहे. विज्ञानाबरोबरच मी अध्यात्माचाही अभ्यासक आहे. मुळातील विज्ञानाची आवड आणि त्यात मी अध्यात्माचा अभ्यासक यामुळे अध्यात्माचे काही विज्ञान आहे का, शतकानुशतके टिकलेल्या चिरकाल अशा अध्यात्माचे आणि माणसाचे असे कोणते वैज्ञानिक नाते आहे ज्यामुळे दोघांचा संबंध अधिकाधिक दृढ होत आहे, अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे हा माझ्या आजवरच्या वाटचालीचा एक भागच बनून गेला आहे. भारतीय स्वयंपाकाचे शास्त्र आणि भारतीयांचे आरोग्य यांचा निश्चित असा परस्परसंबंध आहे, तसाच निश्चित संबंध अध्यात्माचा आणि भारतीय लोकांचाही आहे. अध्यात्माची शास्त्रशुद्ध उपासना करणाऱ्या साधकाचे जीवन केव्हाही अधिक सुखाचे, समाधानाचे आणि समृद्धीचे होते. अष्टांगयोगाचा एक भाग म्हणून साधकांना परिचित असणारे षट्चक्र दर्शन हा ही व्यापक अर्थाने अध्यात्माचाच एक भाग. त्यामुळे त्याच्याकडे मी आकृष्ट होणे स्वाभाविकच होते. पुढे आयुर्वेद आणि अध्यात्माच्या प्रसारासाठीच्या माझ्या निरूपणांमध्ये षट्चक्रांचाही आपसूकच समावेश झाला. षट्चक्रे आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्य यांचा अत्यंत निकटचा संबंध असल्याने ‘सकाळ’च्या ‘फॅमिली डॉक्टर’ पुरवणीत मी या षट्चक्रांवर एक मालिका लिहिली. अल्पावधीतच हा विषय लाखो लोकांपर्यंत पोचला. अनेकांना ही माहिती नवी होती, तर काहींना ती उद्बोधक वाटली. पत्र, फोन, निरोप किती आले याला तर गणतीच नाही. यातून हुरूप वाढल्यामुळे मग षट्चक्रांच्या माहितीसोबतच त्यांची व ॐकाराची साधना कशी करावी याबाबतही काही लेखन केले.\u003cbr\u003eषट्चक्र हा विषय एकत्रित - म्हणजे ग्रंथरूपात हाती आला तर मणिकांचन योग होईल अशी भावना अनेक वाचकांनी व्यक्त केल्यामुळे त्या मालिकेत काही भर घालून, त्यावर संपादकीय संस्कार करून ‘चक्र सुदर्शन’ हा ग्रंथ सिद्ध झाला. माणसाचा विकास भौतिक साधनांवरून मोजला जातो, पण आत्मविकासाची त्याची तृष्णा शमते ती अध्यात्माच्या, षट्चक्र साधनेच्या मार्गावरून केलेल्या वाटचालीतूनच. मनुष्याचा परमोच्च आत्मविकास साधण्याच्या कार्यात आपलीही मदत व्हावी, हीच या लेखनामामागची प्रेरणा आहे...\u003cbr\u003eपाचव्या वर्षी माझी मुंज झाली. त्यानंतर मी रोज १२ सूर्यनमस्कार घालू लागलो. वडिलांनी हळूहळू ही संख्या वाढवायला सुरुवात केली. सूर्यनमस्कार का घालायचे? त्याने काय होते? यासारखे प्रश्न मी त्या वेळी त्यांना विचारी आणि पटणाऱ्या, विज्ञानाचा आधार असणाऱ्या उत्तरांची अपेक्षा करी. वय वाढल्यानंतर प्रश्न वाढले आणि आकलनही. आकाशातल्या सूर्याला साक्षी ठेवून सूर्यचक्राची उपासना केलेली असली तरी आपल्या नाभीच्या ठिकाणी असलेल्या शरीरातील सूर्यालाही जागृत करण्याचा उद्देश आणि क्षमता त्यात आहे; शरीरातील सूर्यामुळे अन्नपचन होऊन शक्तीची निर्मिती होते, सामर्थ्य म्हणजे कर्म करण्यासाठी लागणारी शक्ती मिळते आणि ऊर्जेबद्दल आकर्षण वाढून विकासप्रक्रिया साधली जाते, हे वडिलांनी सांगितले आणि त्या वेळच्या क्षमतेनुसार मला थोडेफार समजलेही.\u003cbr\u003eसमज वाढल्यानंतर अथर्वशीर्षात असलेल्या ‘सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधौ वा जप्त्वा’ या ऋचेचा अर्थ समजून घेताना मेंदूच्या मध्यभागी कल्पिलेल्या सूर्यचक्राची कल्पना लक्षात आली. सप्तशरीरे, सप्तरंग, सप्तस्वर, सप्ताकाश, सप्तलोक, आवर्त-विवर्तांतील साडेतीन गुणिले दोन अशा सात मात्रा या सर्वांची कल्पना आल्यानंतर शरीरस्थ चक्रांची संकल्पना अनुभवाला आली किंवा असे म्हणता येईल, की अनुभवानंतर या कल्पना विशेषरूपाने समजल्या. वेद, उपनिषद, आयुर्वेद, ज्योतिष, योग, संगीत यांच्या परस्परसंबंधातील साताचे गणित जगातील सात आश्चर्यांत समाविष्ट करावयास हवे असे वाटू लागले. पुढे पुढे मला भ्रूमध्यात दिसणाऱ्या प्रकाशाचा अनुभव येत असे.\u003cbr\u003eपुण्यात १९६५ मध्ये मी अभ्यासवर्ग सुरू केले. त्यात सहभागी होणाऱ्या साधकांनाही योगासनांपेक्षा भगवद्गीतेच्या चिंतनात व भगवद्गीतेच्या चिंतनापेक्षा ॐकार गुंजनात अधिक रस असे. तरीही षट्चक्रभेदन, कुंडलिनी उत्थापन याविषयी अनेक जण औत्सुक्य दाखवत असत. कुंडलिनीबद्दल अधिक जाणून घेण्याची मलाही तेव्हा उत्सुकता होती. कुंडलिनीच्या अभ्यासाला योग्य मार्गदर्शन लाभावे असे वाटत असे. म्हणून मी श्री गुळवणी महाराजांच्या आश्रमात जाऊन कुंडलिनीचे रहस्य समजून घ्यावे असे ठरवून पूज्य महाराजांना तशी विनंती केली. त्यावर “हे रहस्य अनुभवानेच समजेल” असे त्यांनी सांगितले. माझे वडील वेदशास्त्रसंपन्न श्री वासुदेवशास्त्री तांबे आणि प. पू. गुळवणी महाराज हे दोघे प. पू. शक्तिपाताचार्य लोकनाथतीर्थ यांच्याकडे शिकत होते. या दोघांच्या गुरुबंधुसंबंधामुळे पूज्य महाराजांबरोबर अशा प्रकारची चर्चा करणे शक्य झाले. महाराजांनी सांगितल्यानुसार मी कुंडलिनीचे रहस्य समजून घेण्यासाठी अनुभवाची दारे आणखी उघडी केली. दीक्षा मिळाली किंवा कुंडलिनी जागृती झाली म्हणजे आता मोक्षात आपल्यासाठी जागेचे आरक्षण झाले असे नाही. अध्यात्मशाखेमध्ये आपल्याला प्रवेश मिळाला. यापुढे प्रत्येक चक्रावर काम केले, त्यांची उपासना केली व बरोबरीने दैनंदिन जीवन नैसर्गिकपणे जगले, आपल्या कर्मांचा त्याग न करता या दोन्ही गोष्टी करीत गेले तर साधकाला आपल्या लक्ष्यापर्यंत जाता येईल हेच खरे. या विषयांच्या चर्चा नेहमीच होत असत. आज्ञाचक्रात दिसणाऱ्या प्रकाशाची अनुभूती साधकाला फार लवकर होऊ शकते. कुंडलिनी जागृती झाल्यावर सर्व शरीर कंपायमान झाल्याचा अनुभव आल्यास तो केवळ कुंडलिनी जागृतीमुळेच आलेला अनुभव आहे असे सांगणे अवघड असते. (किंबहुना अशा कंपनांमुळे काही वेळेला संबंधित व्यक्तीला दैनंदिन जीवन जगणे अवघड होऊन बसते. त्यावर उपचार करताना वेगळ्या आयुर्वेदिक संकल्पनांचा विचार करावा लागतो.) सर्वात अडचणीचे ठरणारे चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. येथे दलदल आहे असे मी म्हणत असे. पृथ्वीतत्त्वाचा जलतत्त्वाशी संपर्क आल्यावर त्या दलदलीतून बाहेर पडणे खूप अवघड असते. याच ठिकाणी मत्सर, काम वगैरे सर्व अडकवितात. यामुळेच जागृत झालेली शक्ती ऊर्ध्वगामी होऊन ब्रह्मरंध्राला जाण्याऐवजी मूलाधार चक्रात त्रास देऊ लागते व साधक अति कामसेवन किंवा अति भौतिकवादी होण्याचा धोका असतो. म्हणूनच कदाचित योगशास्त्राने अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, स्वाध्याय, तप, शौच, संतोष, ईश्वर प्रणिधान यासारखे यम-नियम सुचविले असावेत.\u003cbr\u003eया षट्चक्रांबाबत सर्वत्र नेहमीच आकर्षण असते, असे मला आढळून आले. १९८० नंतर परदेशात गेलो असता तेथे षट्चक्रदर्शनाची माहिती देणारी काही नवी पुस्तके पाहण्यात आली. लेडबिटर यांचे षट्चक्रांबद्दलचे पुस्तक मला माहिती होते पण, त्या वेळपर्यंत ते प्राचीनतेत जमा झाले होते. नव्या पुस्तकांच्या लेखकांपैकी एका लेखकाला भेटण्याचा योग आला. त्याच्याशी चर्चा केल्यावर लक्षात आले, की तो केवळ एक छायाचित्रकार असून त्याने केवळ ऐकीव माहितीवरून ही सर्व चित्रे तयार करून पुस्तक छापलेले आहे!\u003cbr\u003eप्रकाश व ध्वनिसंगीत यांचा स्वास्थ्यासाठी उपयोग करताना शरीराचा व रोगांचा षट्चक्रांशी असलेला संबंध शोधला. सुवासाचा वा औषधांचा प्रत्येक षट्चक्रांशी असलेला संबंध शोधला आणि त्यावर अभ्यास करण्याचे ठरविले. त्यातून एक संकल्पना विकसित झाली. योगविद्या, तंत्र व मंत्र यांचा अभ्यास करीत असताना मंत्रांचा संगीताशी असलेला संबंध उमगला. त्याचप्रमाणे संगीत, योगविद्या, आयुर्वेद, ज्योतिष यांचा परस्परसंबंध लक्षात आला. या सर्वांचा संबंध षट्चक्रांशी असल्यामुळे त्यांचा संबंध प्रत्येक व्यक्तीशी वा त्याच्या शरीराशी आहे हेही लक्षात आले. त्यातून प्रकाश व संगीताच्या माध्यमातून स्वास्थ्य देता येईल ही कल्पना दृढ झाली. संशोधनानंतर तशा प्रकारची उपचारपद्धती विकसित केली. एकूण काय, तर या षट्चक्रांविषयी सर्वांच्या मनात असलेले आकर्षण, जीवनातील त्यांची उपयुक्तता किंवा त्याचा उपयोग करून घेऊन जीवन आरोग्यमय, आनंददायी कसे करता येईल या बाबतीत परमेश्वरी योजना लक्षात आली. त्यानंतर थोडक्यात पण शंकेचे निरसन होईल अशा तऱ्हेने षट्चक्रांसंबंधी माहिती साधकांसाठी उपलब्ध करून दिली. पण ती माहिती अत्यंत त्रोटक होती. त्यात चक्रे व त्या ठिकाणी असलेली शक्ती यांचे जर पूर्ण संतुलन झाले नाही तर कोणते शारीरिक व मानसिक दोष येऊ शकतात; त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींचे चक्र व त्या ठिकाणी असलेली शक्ती यांचे संतुलन झालेले आहे त्यांची शरीरे कशी आहेत, त्यांना काय फायदा होतो, त्यांच्या मानसिक धारणा कशा असतात, त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे असते या विषयी माहिती प्रसिद्ध केली.\u003cbr\u003eनंतर एक लक्षात आले की शरीराभोवती असलेल्या तेजोवलयाचा, ज्यावर षट्चक्रांचा प्रभाव असतो, अभ्यास केल्यास व्यक्तीच्या शरीरात घडणाऱ्या घटना, रोग वा त्याची मानसिक अवस्थाही समजू शकेल. यातूनच पुढे ‘ऑरा मशिन’ म्हणजे शरीराभोवती असलेल्या तेजोवलयाचा अभ्यास करणारे किंवा तेजोवलयाची आकृती व रंग दाखविणारे यंत्र इतरांच्या मदतीने तयार केले. पुढे युरोपमध्ये एका संस्थेने हे यंत्र बनवून विकण्यास सुरुवात केली. तेव्हा समाजात षट्चक्रांविषयी जागृती अधिकच वाढली. त्यानंतर अशा प्रकारची अनेक यंत्रे बाजारात आली. नंतर संपूर्ण शारीरिक, मानसिक, षट्चक्रांशी जवळीक दाखविणारे असे अप्रतिम यंत्र तयार केले व षट्चक्रांचा अभ्यास वाढावा अशी योजना केली. या सर्व योजनेतून आता तयार होत आहे ‘चक्र सुदर्शन’ हे पुस्तक.\u003cbr\u003eहे पुस्तक तयार करताना अनेकांची मदत झाली. आत्मसंतुलन व्हिलेजमध्येच राहात असलेल्या कु. रत्ना हिने दिलेल्या सूचनांप्रमाणे चक्रांची चित्रे तयार करून दिली. अनुभूतीतून आकारलेली चक्रांसंबंधीची संकल्पना चित्रात उतरविण्याचे काम तिने चोखपणे केले. या पुस्तकाला लागणारी छायाचित्रे काढण्याचे आणि मुखपृष्ठ तयार करण्याचे काम माझा मुलगा चि. सुनील याने केले. तसेच फोटो डिजिटलराईझ करण्याचे काम श्री. नीरव मिस्त्री यांनी केले. विजया कोल्हे यांनी या पुस्तकाचे लेखन करण्यासाठी मदत केली. ‘सकाळ’मधील श्री. संजीव लाटकर व श्री. अभिजित मुळ्ये यांनी पुस्तकाच्या दृष्टीने अनेक सूचना करून मजकुराचे संपादनही केले. ‘सकाळ’चे आर्टिस्ट श्री. प्रभाकर भोसले आणि व्यवस्थापक श्री. हेमंत वंद्येकर यांनीही या पुस्तकाच्या घडणीत मोलाचा हातभार लावला. अशा तऱ्हेने अनेक जणांचे हात या रथचक्राला लागून हे चक्र फिरत पुस्तकरूपाने सर्वांपर्यंत पोचेल अशी शक्यता तयार झाली. या सर्वांचा मी आभारी आहे.\u003cbr\u003eषट्चक्रांचा अभ्यास आणि साधना करण्याने आपल्यामध्ये किती चांगला आणि अनुकूल बदल घडतो, ही अनुभवण्याचीच गोष्ट आहे. हा ग्रंथ माझ्याकडून लिहून घेण्यातही काही निश्चित अशी ईश्वरी योजना आहे, याविषयी मला खात्री आहे. आपणही याच श्रद्धेने हा ग्रंथ वाचावा, अशी विनंती आहे. ग्रंथ वाचताना आपल्याला काही प्रश्न पडले, काही शंका असल्या तर निःसंकोचपणे मला खालील पत्त्यावर टपालाने तसे पत्र पाठवा. षट्चक्रांसंबंधीची आणखी माहिती, उपयुक्तता वाढविण्याच्या दृष्टीने प्रात्यक्षिके, चक्रसंतुलनासाठी करावी लागणारी योगासने, आहार, जीवनातील शिस्त यांचा अंतर्भाव असणारा दुसरा भागही लवकरच प्रसिद्ध करण्याचा माझा संकल्प आहे. त्यात मी निवडक व महत्त्वाच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न मनापासून करेन. धन्यवाद!\u003cbr\u003eडॉ. श्री बालाजी तांबे\u003cbr\u003eआत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला ४१०४०५.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57228735185199,"sku":null,"price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/37526085-81B6-4397-9699-73E3992A430A.jpg?v=1777125328"}],"url":"https:\/\/pipagro.com\/collections\/ancient-wisdom-modern-health-books.oembed","provider":"PIP AGRO","version":"1.0","type":"link"}