{"product_id":"santulan-kriyayog-yoga-balanced-action-dr-balaji-tambe","title":"संतुलन क्रियायोग | The Yoga - Balanced Action| Dr Balaji Tambe","description":"\u003ch5\u003eमनोगत\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003eआजकाल अनेकांना रोजच्या दिनक्रमात योगाभ्यासाचा अंतर्भाव करायची इच्छा असते. पण आजच्या गतिमान आयुष्यात, जीवनाचा अर्थ व हेतू शोधण्यासाठी पुरेसे महत्त्व न दिल्यामुळे अनेक जण योगाभ्यासासाठी योग्य तेवढा वेळ देऊ शकत नाहीत असे दिसते. शारीरिक व्याधींनी ग्रस्त असूनसुद्धा माझे काही रुग्ण आसने व प्राणायाम करू इच्छित होते. या सर्वांची अडचण लक्षात आल्याने इसोटेरिक क्रियायोगातील संदर्भ घेऊन मी संतुलन क्रियायोगाची रचना केली. हठयोगातील आसने व प्राणायाम (शरीरस्वास्थ्यासाठी खूप चांगला उपयोग होत असल्याने) यांचा संदर्भ घेऊन 'संतुलन क्रियायोग - स्काय' (Santulan Kriya Yog - SKY), 'संतुलन क्रियायोग आसन - स्काय आसन' आणि 'संतुलन भस्त्रिका - स्काय भस्त्रिका' यांची रचना करण्यात आली आहे. संतुलन क्रियायोग सहजपणे शिकून त्याचा अभ्यासही सहजपणे करता येतो.\u003cbr\u003eसंतुलन क्रियायोगाची प्रथम ओळख करून दिल्यानंतर सर्व वयोगटांत त्याचा प्रसार लगेचच झाला. 'संतुलन क्रियायोग'च्या परिणामांबद्दल मी सखोल संशोधन केले. हे परिणाम खूपच आशादायक असल्याने मी केंद्रात राहून पंचकर्म करणाऱ्या रुग्णांच्या दैनंदिन कार्यक्रमात संतुलन क्रियायोगाचा समावेश केला. याचे योग्य ते परिणाम दिसल्याने महिन्याच्या उपचारानंतर इथून घरी गेल्यावरसुद्धा अनेकांनी संतुलन क्रियायोगाचा अभ्यास सुरू ठेवला असल्याचे कळविले.\u003cbr\u003eगेल्या अनेक वर्षांत संतुलन क्रियायोगाच्या परिणामांबद्दल अनेकांनी आपले मत कळवले आहे. संतुलन क्रियायोग शिकणे खूप सोपे आहे, 'याचा दैनंदिन आयुष्यात सहज समावेश करता येतो', 'अनेक वर्षे याचा अभ्यास विनासायास करणे शक्य आहे' या व अशा तऱ्हेच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. अलीकडेच युरोपमध्ये कार्यशाळा घेण्यासाठी गेलो असता, लंडनमध्ये ८० वर्षांच्या एका महिलेशी माझी गाठ पडली. अनेक वर्षांपूर्वी त्या पुण्यात आल्या असता माझ्याकडून संतुलन क्रियायोग शिकल्या होत्या. 'मी अजूनही रोज संतुलन क्रियायोगाचा अभ्यास करते; मला त्याचा खूप चांगला उपयोग झालेला आहे' असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले आणि मोठ्या उत्साहाने संतुलन क्रियायोगातील स्थैर्य ही क्रिया कार्यशाळेसाठी जमलेल्या सर्व मंडळींसमोर करून दाखवली.\u003cbr\u003eसारांशाने सांगायचे म्हटले तर, संतुलन क्रियायोगाचा अभ्यास करणाऱ्यांना खूप उपयोग झालेला दिसतो, प्रकृतीमध्ये काही बिघाड झालेला असतानासुद्धा याचा अभ्यास सहजतेने करता येतो व त्याचे उत्तम फायदे होताना दिसतात. संतुलन क्रियायोगाचा आपल्या दैनंदिन कार्यक्रमात समावेश केलेल्यांना उत्तम शरीरस्वास्थ्य बरोबरच सर्जनात्मकता व मनाची शांतीही मिळते.\u003cbr\u003eसंतुलन क्रियायोग या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध झाल्या आहेत. 'हे पुस्तक मराठीत असावे' अशी मागणी अनेकांनी सातत्याने केल्याने संतुलन क्रियायोग या पुस्तकाची मराठी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात येत आहे.\u003cbr\u003eबाळाजी तांबे\u003cbr\u003eआत्मसंतुलन व्हिलेज\u003cbr\u003eकार्ला, नोव्हेंबर २०१०\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57228455248175,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/DFB82C5D-009C-4DE5-9151-8020EE2436D9.jpg?v=1777118563","url":"https:\/\/pipagro.com\/products\/santulan-kriyayog-yoga-balanced-action-dr-balaji-tambe","provider":"PIP AGRO","version":"1.0","type":"link"}