उडीसाने काय दाखवल - भाग ३ आणि शेवटचा

उडीसाने काय दाखवल - भाग ३ आणि शेवटचा

Santosh Bobade

जीवन म्हणजे काय ? ब्रम्हांड कसं उत्पन्न झाल ? सूर्याचा उदय कसा झाला? पृथ्वीवर जीव कसा आला ? आणि शेवट म्हणजे चेतना (consciousness) म्हणजे काय ? विज्ञानाला पडलेले हे पाच सगळ्यात मोठे प्रश्न.
बीएससी करत असताना origin of life ह्या विषयाने वेड लावलं होत.संपूर्ण वर्षात एखाद- दुसऱ्या वर्गाला बसलो असेल.पण बाकीचा वेळ ग्रंथालय, संग्रहालय, वाचनालय यात बसून फक्त आणि फक्तं origin of life च वाचन.परीक्षा आली. सगळे मित्र सांगत होते की, हा प्रश्न आलाच नाही तर.
पण मी परीक्षेसाठी वाचतच नव्हतो.योगायोग असा की परीक्षेला पहिला प्रश्न तोच आला. What is Origin of Life.एक उत्तरपत्रिका संपवून मी अजून चार पुरवण्या फक्त त्याच प्रश्नाचं उत्तर लिहल. शेवटचे 20 मिनिट राहिले तेव्हा बाकीच्या प्रश्नांना हात घातला.तरीही 25 गुणांचा एक प्रश्न राहिलाच.निकाल लागले.अन् मला 100 पैकी 70 मार्क्स मिळाले.त्यावर्षी आमच्या विद्यालयात मलाच सगळ्यात जास्त गुण होते.

   
नंतर एम एस सी साठी शिकत होतो.एकदा एका शिक्षकांनी बोलवून मला हातात एक पेपर दिला.हा तोच पेपर ज्यावर मी origin of life च उत्तर लिहिलं होत. सर म्हणाले ,एवढंच छान उत्तर मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीच वाचलं नाही.
देब सर सांगत होते अन् आम्ही ऐकत होतो.एकदा विषयाच्या प्रेमात पडला की तुम्ही विषयाला कितीही डावललं,मात्र विषय तुम्हाला सोडत नाही.
नुसता भात नाही,तर वनस्पती विज्ञान, संस्कृती,तत्वज्ञान,धर्म,गणित अजून कितीतरी आपल्याला माहिती नसलेल्या विषयांचा त्यांचा व्यासंग आहे.आम्ही आयुष्य जगलो अस म्हणण्याचा अधिकार खरतर फक्त अशाच अवलिया आहे.अस मला वाटत.
सरांकडे असलेला लॅपटॉप,मोबाईल,अंगावरील कुर्ता हे सगळं त्यांच्या विद्यार्थ्यानी दिलेल्या भेटी. कपड्यांना डाग लागू नये म्हणून धडपड करणारे आपण सगळेच यांची भेट घेऊ शकतो का ?
वसुधा. जिथे सर 1400 जातींच जतन करतात ती जागा तेथील आदिवासी शेतकऱ्यांनी दिलेली आहे. शाश्वतता म्हणजे काय ? ती कशासोबत खातात हे जाणण्यासाठी इथे जरूर यावं लागेल.तेथील सगळी लाईट सौर उर्जेवर चालते. घर मातीच्या कच्चा विटा,लाकूड,भाताच्या पेंड्याच छप्पर,शेणाने सारवलेली जमीन याने बनलेले. जेवणासाठी पत्रावळी (झाडांच्या पानांची प्लेट),शेतातील भरपूर भात, आजूबाजूच्या भाज्या,एक मिरची ,लिंबुची फोड. जेवलेल ताट पुन्हा एका कंपोस्ट खड्यात टाकायचं.बाजूलाच चालू असलेल्या झऱ्याच पाण्याने हात धुवायचे तेच पाणी पुन्हा झाडांना जात.पुन्हा मातीत मुरत,पुन्हा आपल्याला मिळत.
म्हणजे काय तर एकंदरीत शून्य कचरा.
घनदाट जंगल असून सुद्धा पक्षांचे फार आवाज नाहीत.येथील आदिवासी अनेक पक्षी मारून खातात त्यामुळे पक्षी संपले किंवा त्यांनी स्थलांतर केले असे समजले.पेरणी किंवा शेतीच्या इतर कामासाठी म्हैस,गाई,रेडा यांचा उपयोग होतो. इथे स्त्री पुरुष असा भेद नसतोच.
इथली माती लाल,पांढरी अन् काळी देखील आहे. मातीचा रंग कोकणातील मातीचा असला तरी इथे कातळ खडक सापडत नाही.डोंगरावर देखील आपल्या सह्याद्रीसारखा टणकपणा नाही.मातीच प्रमाण प्रचंड असल्याने इथे विविध खनिजे सापडतात. कदाचित त्याचंमुळे हे जंगल लवकरच भुईसपाट होणार आहे.येथील आदिवासी मातीतून खनिजे वेगळे करने व त्याचे दागिने बनविणे याची कला जाणतात.शर्टपँट घालून किती बंदिस्त,संकुचित राहत असतो आपण , या माणसांकडे पाहिलं की जिवंतपणा दिसतो चेहऱ्यावर.त्यांचे डोळे कितीतरी समृध्द असतात.
खोटं बोलयच असत,वाईट वागायचं असत,शेतात रसायने टाकायची असतात,झाड तोडून पैसे कमवायचे असतात हे विचार त्यांच्या मनाला शिवत सुद्धा नाहीत.
अर्थात ,येणारी नवीन पिढी दोनचाकी वर बसून जेव्हा भुर्रकन निघून जाते, तेव्हा थांबून मागे काहीतरी हरवलय,जंगल काहीतरी सांगतय हे ऐकायचा संयम सुद्धा हरवला आहे का ?
पृथ्वीला आपण आई म्हणतो.आई म्हणजेच एक स्त्री.आणि स्त्री ही नेहमी संयमी असते. निसर्गात जलद अस काहीच होत नाही.आपण सगळेच निवांत बसायचं विसरलोय का ?
जन्म झाल्यावर ओवाळायला तांदूळ , बारश्याला मुलासाठी अन् आईची ओटी भरताना तांदूळ, पाहिलं अन्न तेव्हा तांदूळ , बुध्दीवाढावी म्हणून पेजेसाठी तांदूळ,लग्नामध्ये अक्षदा म्हणून तांदूळ,आयुष्य संपल्यावर प्रेत यात्रेत मागे फेकतात त्या तांदूळ लाह्या.
या अशा तांदुळला आम्ही काय दर्जा दिलाय ?
आता पुन्हा परतीचा प्रवास.पूर्वेकडून पश्चिमेकडे.अजून दोन वेळा इकडे यायचं आहे. सरांचे काम एव्हढे प्रचंड मोठे आहे की आम्ही वेगवेगळ्या राज्यातील ४० लोक यासाठी आलो आहोत.
पण ही ४० माणस हे सगळ तसच पुढे न्यायला पुरतील का ?
अशा कामांसाठी पैसा उभा राहील सुद्धा, पण माणसांचं काय ?
माझ्या खिशात कोणात मोबाईल आहे ,यापेक्षा माझ्या पोटात काय जातंय याच महत्व पटायला अजून किती करोना यायला हवेत अस आपल्याला वाटत ?
कदाचित आपल्या आठवणीतून तांदूळ जाईल सुद्धा , परंतु तांदळाच्या आठवणीत आपण कायमचे राहिलो आहोत त्याच काय ?
असो.
तूर्तास अल्पविराम.

                                        

Back to blog

Leave a comment