आज देशातील प्रत्येक जीवाला प्रोसेस्ड अन्नापासून स्वातंत्र्य मिळवण्याची खरी गरज आहे.
Santosh BobadeShare
१५ ऑगस्ट. आपला स्वातंत्र्यदिन. आपल्या देशाने राजकीय गुलामगिरीतून मुक्त होऊन ७७ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. पण आज आपण एक नवीन गुलामगिरी अनुभवतोय. ती आपल्या तब्येतीची, आपल्या आहाराची, आणि आपल्या जीवनशैलीची. पॅकेटमध्ये बंद अन्न, चमकदार लेबले, कृत्रिम चव, टिकवणूकासाठी वापरलेले रसायनं हे सर्व आपल्याला स्वातंत्र्य देत नाहीत, तर शरीराच्या नैसर्गिक रचनेपासून दूर नेतात.
PIP Agro मध्ये आम्ही मानतो, की खरी स्वातंत्र्यता म्हणजे शरीर, मन आणि जेवण यांचं सौंदर्य नैसर्गिक आणि शुद्ध स्वरूपात अनुभवणं. आजच्या काळात आपण ‘झटपट’चा मार्ग शोधत राहतो. झटपट तयार होणारे स्नॅक्स, रेडी-टू-ईट पदार्थ, आणि महागड्या पॅकेटमध्ये आलेल्या वस्तू आपण ‘सोयीस्कर’ मानतो. पण ही ‘सोय’ आपल्याला हळूहळू आरोग्यापासून दूर नेत असते. स्वातंत्र्यदिनी आपण आपल्या देशासाठी झेंडा फडकवतो. यंदा एक झेंडा आपल्या आरोग्यासाठीही फडकवा, प्रोसेस्ड अन्नापासून मुक्त होण्याचा.
एक विचार करा – आपल्या आजीच्या किंवा आईच्या हातचं जेवण आठवा. त्यात गंध होता, पोषण होतं, आणि सर्वात महत्त्वाचं शुद्धता आणि मायेचा स्पर्श होता. गाईच्या तुपातला फोडणीचा सुगंध, गुळाची पोळी, घरच्या ताकाचा गारवा या सगळ्यात स्वातंत्र्य आहे! हे अन्न कोणत्याही प्रक्रिया न करता, आपल्या हातांनी बनवलेलं असतं, ते शरीरासाठी पोषक असतं, आणि नात्यांमध्ये प्रेम वाढवतं.
या स्वातंत्र्यदिनी, केवळ राष्ट्रासाठी झेंडा उंचावू नका, तर स्वतःच्या शरीरासाठीही एक वचन द्या – "मी आता शरीराला प्रोसेस्ड अन्नापासून मुक्त करेन." पारंपरिक अन्नाचा स्वीकार करा. देशी गाईचं तूप, ताक, गूळ, बाजरी, नाचणी, घरगुती लोणचं, भाज्या हे आपलं खरं स्वातंत्र्य आहे. यामध्ये कृत्रिम चव, रंग, रसायनं नाही... आहे ते फक्त आरोग्य, परंपरा आणि आपुलकी.
या वर्षी एक नवीन क्रांती करा. शुद्धतेच्या बाजूने, शरीराच्या आरोग्याच्या बाजूने. स्वातंत्र्याचा अर्थ आहे निवडण्याचं स्वातंत्र्य....आणि यंदा, निवडा खरं, शुद्ध, पारंपरिक आणि पोषणमय अन्न!
PIP Agro कडून आपणास स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!