
कृषी दिन : शेतीला मान, शेतकऱ्याला साथ आणि अन्नाला आदर
Santosh BobadeShare
शेती म्हणजे केवळ अन्न उत्पादन नव्हे. ती आपल्या संस्कृतीची, जीवनशैलीची आणि अस्सलतेची मूळ ओळख आहे. 1 जुलै, कृषी दिन, हा केवळ एक सरकारी दिनदर्शिकेतील दिवस नाही. तो एक स्मरण दिवस आहे, आपल्या मातीतून पिकणारं अन्न तयार करणाऱ्या त्या हातांचा, जे आपल्यासाठी न दिसता, न बोलता आयुष्यभर राबतात.
PIP Agro या प्रवासाची सुरुवातही याच तत्त्वावर झाली – "मातीशी नातं निर्माण करणं, आणि ताटात आरोग्यदायी समृद्धी पोहोचवणं." आम्ही शेतकऱ्यांशी केवळ व्यवहार करत नाही, तर त्यांचं आयुष्य, पद्धती, ऋतूंशी जुळवलेली शेती हीच आमच्या ब्रँडची खरी ओळख आहे.
आपण खातो तो खापली गहू, ते साजूक तूप, ते कोकणातील लोणचं या सगळ्यामागे कोणीतरी आजोबा-आजी, एक महिला स्वयंसहायता गट, किंवा एक युवा कृषीतज्ज्ञ असतो, ज्याने ती भेगाळलेली माती पाणी पाजून सजीव केलीय. कृषी दिन हा त्या सर्वांच्या नजरेत एक नवीन उमेद घेऊन येतो – "आपलं काम कोणीतरी पाहतंय, समजतंय आणि त्याला महत्त्व देतंय."
PIP Agro मध्ये आमचं धोरण नेहमी एकच राहिलं आहे. थेट शेतकऱ्यांकडून ताजं, पारंपरिक आणि तितकंच पौष्टिक अन्न ग्राहकांपर्यंत पोहोचवणं. यासाठी आम्ही कुठलाही दलाल, प्रोसेसिंग चेन किंवा कृत्रिम पद्धतीचा वापर करत नाही. आम्ही विश्वास ठेवतो की प्रामाणिक मेहनतीने पिकवलेलं अन्न हीच खरी शुद्धता असते.
आपण कितीही मॉडर्न झालो, तरी आपल्या शरीराला आणि मनाला आराम देणारं अन्न तेच असतं, जे आपल्या पिढ्यानपिढ्या खाल्लं गेलंय. खपली गहू, देशी तांदूळ, अगदी आजीने घरात बनवलेलं वाटणं हे केवळ पदार्थ नाहीत, तर आठवणी आहेत. आणि त्या आठवणींचं जतन करणं, हेच आमचं खरं काम आहे.
आज कृषी दिनाच्या निमित्ताने आपण एकदा तरी थांबून विचार करूया. आपल्या ताटात आज जे आहे, ते कुणाच्या मेहनतीने, कुठल्या मातीमधून, कुठल्या रितीरिवाजाने आलं आहे? आणि मग जेव्हा आपण आमचं उत्पादन उघडता, खाता तेव्हा त्यामागे लपलेली ही कहाणी तुम्हाला अधिकच समाधान देईल.
शेतीला मान, शेतकऱ्याला साथ आणि अन्नाला आदर – हाच PIP Agro चा मंत्र आहे.
आपणही या नात्याचा भाग बना. मातीशी नातं जपा. आणि अन्न खरेदी करताना त्या मागच्या कष्टांचं भान ठेवा.
तुम्हीही आमच्या या प्रवासात सहभागी व्हा.
शुद्ध, प्रामाणिक आणि घरगुती चव अनुभवण्यासाठी आजच PIP Agro वर भेट द्या –
www.pipagro.com