रात्रभर कुशी बदलत असता? शांत आणि गाढ झोपेसाठी हे 'हजारो वर्ष जुनं' आयुर्वेदिक सिक्रेट नक्की वाचा!

Santosh Bobade

मला माहिती आहे... तुमची सध्याची अवस्था काय आहे. दिवसभर थकून भागून अंथरुणावर पडलात, तरी डोळ्यावर झोप येत नाही. रात्रभर फक्त कुशी बदलत राहता, विचारांचं चक्र सुरूच राहतं आणि सकाळी उठल्यावर पुन्हा तोच थकवा जाणवतो.

तुम्ही म्हणाल, "हे आजकाल सगळ्यांचंच झालंय!" पण थांबा...

माझं मात्र तसं नाही. मला पडल्या-पडल्या झोप लागते. अगदी शांत आणि गाढ झोप! आणि हे काही आजचं नाही, तर गेले तीन वर्ष मी हा अनुभव दररोज घेतेय.

तुम्हाला वाटेल, याचं काय सिक्रेट आहे? माझं सिक्रेट कोणतीही महागडी गोळी किंवा गॅझेट नाही, तर ते हजारो वर्ष जुनं आहे. आणि ते आपल्या आयुर्वेद ऋषींनी आपल्याला सांगून ठेवलंय.

काय सांगतात ऋषी वाग्भट आणि चरक?
आपल्या आयुर्वेदातील महान ऋषी वाग्भट सांगतात, "रोज शरीराला तेल लावा (अभ्यंग करा). पण धावपळीच्या युगात जर पूर्ण शरीराला जमत नसेल, तर निदान डोके, कान आणि पायाला तरी तेल लावलंच पाहिजे."

आणि ऋषी चरक यांनी तर यावर आणखी खोलवर सांगितलंय. ते म्हणतात, "जो माणूस रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही पायांच्या तळव्याला तेलाने मालिश (पादाभ्यंग) करतो, त्याचे फायदे अफाट आहेत:" 

१. दिवसभराचा थकवा निघून जातो. 
२. शरीरातील वाढलेला 'वात' शांत होतो. 
३. डोळ्यांचं आरोग्य सुधारतं (कारण तळव्यांचा आणि डोळ्यांचा थेट संबंध असतो). 
४. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी आजकाल दुर्मिळ झालीये, ती 'गाढ झोप' लागते.

पण बेडशीटचं काय?

आता हे वाचून काही हुशार मंडळींच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल- "अहो, पायाला तेल लावून झोपलो तर आमच्या बेडशीट्स खराब होतील ना! त्यांचं काय?"

याचं उत्तर अगदी सोपं आहे. जसं आपण एखाद्या गाडीचे पार्ट नीट चालावेत म्हणून त्याला ऑइलिंग (Oiling) करतो, आणि ते ऑइल ती मशीन शोषून घेते, तसंच आपलं शरीरही आहे. आपले पाय दिवसभर धावपळ करून कोरडे झालेले असतात. तुम्ही तळव्यांना मसाज केलात की, काही मिनिटांतच पाय ते तेल शोषून घेतात.

त्यामुळे बेडशीट खराब होण्याची चिंता नसावी, आणि तरीही शंका असेल तर पायाखाली एखादा जुना नॅपकिन किंवा टॉवेल ठेवू शकता. पण एका बेडशीटसाठी शांत झोपेशी तडजोड का करायची?


पण प्रश्न उरतो की तेल किंवा तूप कोणतं वापरावं? यासाठी बाजारातलं कुठलंही केमिकलवाल्या तेलाचा उपयोग नाही. यासाठी हवं शुद्ध लाकडी घाण्याचं तेल किंवा देशी गाईचं तूप. हे दोन्हीही पदार्थ नैसर्गिकरित्या शरीरात उष्णता कमी करण्यास आणि शांत झोप लागण्यास मदत करतात.

तुम्हाला शुद्ध आणि खात्रीशीर लाकडी घाण्याचं तेल हवं असेल, तर www.pipagro.com वर नक्की भेट द्या. तिथं तुम्हाला अस्सल लाकडी घाण्याचं तेल आणि तूप मिळेल.

तेल कुठूनही घ्या, पण सुरुवात आजच करा. 
कारण 'आरोग्यम् धनसंपदा' हेच खरं धन आहे!

Back to blog

Leave a comment