Skip to product information
1 of 2

Shetitun Smrudhikade - Farm to Prosperity | शेतीतून समृद्धीकडे | Vinayak Mahajan Book

Shetitun Smrudhikade - Farm to Prosperity | शेतीतून समृद्धीकडे | Vinayak Mahajan Book

Regular price Rs. 150.00
Regular price Sale price Rs. 150.00
Sale Sold out
Taxes included. Shipping calculated at checkout.
Check Estimated Delivery Date

View full details
आनंदवार्ता 

प्रार्थना
खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा । झटू सर्वभावे करू स्वर्ग गावा ॥

कळो हे वळो, देह कार्य पडू दे । घडू दे प्रभो, एवढे हे घडू दे ॥
- ग्रामगीता

विनायक श्रीकृष्ण महाजन
२० वर्षे मुंबई येथे वास्तव्य.
अभियांत्रिकी व्यवसाय व सल्लागार म्हणून
जम्मू, दिल्ली, कोलकत्ता, पुणे व बेळगाव येथे कार्य.
१९९३ साली पुन्हा गावाकडे.
कोकम सोडा शीतपेयाचे उत्पादन व पेटंट.
दापोली तालुक्यात बिगर राजकीय शेतकरी संघटनेसाठी कार्यरत.
शाश्वत कृषी संवाद मासिक वार्तापत्राचे काही वर्षे संपादन. बायोगॅस (गोबरगॅस)


घडाभर नमन


मी स्वतः लेखक नाही. उद्योजक आहे. शेती हा माझा आवडीचा विषय आहे. सामाजिक कार्य करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. १९७३ साली मी ११वी एस. एस. सी. पास झालो. माझे मूळगाव कोळथरे, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथूनच. तेथून पुढे २० वर्षे मुंबईमध्ये होतो. अभियांत्रिकीमधील पदविका, नोकरी व नंतर स्वतःचा इंजिनिअरींग कारखाना. मुंबईतील २० वर्षांच्या वास्तव्यात आणखी एक महत्वाचा टप्पा विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश केला. १९९३ साली मी, माझी सौभाग्यवती वीणा, मुलगा वरूण; आम्ही गावाकडे येण्याचा निर्णय घेतला. जूनमध्ये माझे मूळ गावाच्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये चि. वरूण इयत्ता १ली मध्ये जाऊ
लागला.
ग्रामविकासाचे स्वप्न मनात होतेच. सामाजिक कार्याचे बाळकडू वडीलांकडूनच मिळालेले होते. माध्यमिक शिक्षण होईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनंदिन सायं. शाखेचा स्वयंसेवक होतो. संघशिक्षा वर्गाचे दोन टप्पेही पूर्ण केले होते. १९९३ ला पुन्हा गावी आल्यावर चरितार्थासाठी व्यवसाय सुरू केला. सामाजिक बांधिलकी असल्याने स्थानिक शेतकऱ्यांबरोबर ग्रामविकासासंबंधी चर्चा होऊ लागल्या. ५ - १० एकर जमीन घेऊन शेती व फळप्रक्रिया कारखाना सुरू करण्याचे ध्येय मुंबई सोडताना निश्चित होते. कोकम सोडा हे शीतपेय उत्पादन करण्याचे ठरवूनच गावात पाऊल ठेवले होते. आता मुंबईतील स्थिरस्थावर इंजिनिअरिंगचा कारखाना, स्वतःचे घर सोडले होते. गावात आल्यावर शेतकऱ्यांच्या बिगर राजकीय संघटनेची आवश्यकता प्रकर्षाने जाणवली. शेतकरी संघटित होणे गरजेचे आहे म्हणून प्रयत्न सुरू केले. त्यातून शेती, शेतकरी यांच्याबद्दल आस्था आणखी वाढू लागली. ५ एकर जमीन घेऊन तेथे कोकम सोडा व इतर पेये कारखाना स्थलांतरित करून झाला. कारखाना, घरासाठीची जागा सोडून उर्वरित जमिनीत शेती, लागवड करण्यासाठी शेतीतील, लागवडीतील आर्थिक गणिताचा अभ्यास सुरू केला. कोकण कृषि विद्यापीठातील तज्ञांचे मार्गदर्शन व स्थानिक शेतकऱ्यांचा अनुभव यांचा ताळमेळ बसत नव्हता. शेतकरी अज्ञानी आहेत. नव तंत्रज्ञानाचा धोषा स्वत: शेती न करणारे कृषि अधिकारी व कृषि शास्त्रज्ञ यांनी लावला होता.अजूनही नव तंत्रज्ञानाचे तुणतुणे वाजविणे सुरूच आहे. १९९३ ते आजपर्यंत शेती व शेतकरी यांचा अभ्यास असे सांगतो की दोघांची स्थिती दिवसागणिक खालावतच आहे. खास करून जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था यांच्या अंमलबजावणीतून शेतीची जागतिक लूट खुलेपणाने सुरू झालेली मला दिसत आहे. हे आपणासमोर मांडण्यासाठी आणि शेती व शेतकरी यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी हे लेखन. १७व्या - १८व्या शतकात आपल्या देशातून सोन्याचा धूर निघत होता. असा समृद्ध संपन्न देश पुन्हा होण्यासाठी आपण शेतकरी काय करू शकतो हे पाहण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे. माझ्या नावामागे तथाकथित कोणतीही उपाधी नाही पण माझ्या या लेखनामागची प्रेरणा, तळमळ आपल्या लक्षात यावी म्हणून हे घडाभर नमन !